Aishwarya Narkar and Avinash Narkar : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावर ट्रेंड होतं असलेल्या गाण्यांवर डान्स व्हिडीओ करत असतात. जसं ऐश्वर्या व अविनाश यांच्या कामाचे चाहते आहेत, तसंच त्यांच्या डान्स व्हिडीओचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक नारकर जोडी आहे. नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी पंजाबी गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. 'हौली हौली' असं कॅप्शन लिहित ऐश्वर्या नारकरांनी ( Aishwarya Narkar ) डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या अविनाश यांच्याबरोबर अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'खेल खेल में'मधील 'हौली हौली' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी दोघं गाण्यातील जबरदस्त हूकस्टेप करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या एनर्जीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हेही वाचा - Video: बायकोची माफी मागत प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ केला शेअर, स्वप्नील जोशी म्हणाला, “तुला भीती नाही का?” तसंच व्हिडीओत ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) गुलाबी रंगाच्या कॉटन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. अविनाश नारकर हे फिकट गुलाबी रंगाचं शर्ट व त्यावर जीन्स या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. दोघांच्या या डान्स व्हिडीओवर पुन्हा एकदा चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील अभिनेत्री एकता धनगरने लिहिलं आहे, "माझ्या माहितीतलं सर्वात तरुण जोडपं." तसंच एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, "जगातील सर्वात भारी जोडी." दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, "एकदम झकास." तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, "अनिल कपूरसुद्धा तुमचे चाहते होतील." हेही वाचा – “तू माझ्या आयुष्यात अशा वेळी आलीस…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने होणारी बायको शिवानी सोनारसाठी लिहिली खास पोस्ट .यामुळे ऐश्वर्या नारकर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेचा घेणार निरोप दरम्यान, ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांची 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून एक्झिट होणार आहे. कथेनुसार विरोचकाचा वध होणार आहे. त्यामुळे ऐश्वर्या नारकरांच्या भूमिकेचा शेवट होणार आहे. अविनाश नारकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश यांचा ‘डंका हरी नामाचा’ चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अविनाश नारकरांसह अभिनेता अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, रसिका सुनिल, अक्षया गुरव झळकले आहेत. या चित्रपटातील गाणी सध्या चांगली चर्चेत आहेत.