Aishwarya Narkar & Avinash Narkar Dance Video : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. गेली वर्षानुवर्षे मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. मराठी कलाविश्वातील सदाबहार जोडी म्हणून ऐश्वर्या व अविनाश यांच्याकडे पाहिलं जातं.
ऐश्वर्या व अविनाश नारकर उत्तम कलाकार आहेतच पण, याचबरोबर ते इन्स्टाग्रामवरील विविध ट्रेंडिंग गाण्यांवर हे दोघेही रील्स व्हिडीओ बनवत असतात. डान्स करताना या दोघांची तुफान एनर्जी नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेते. या जोडप्याने नुकताच एका लोकप्रिय तामिळ गाण्यावर ठेका धरला आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर करत हटके कॅप्शन लिहिली आहे.
येत्या महिन्यात दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा ‘रेट्रो’ सिनेमा सर्वांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील कनिमा ( Kanimaa ) हे तामिळ गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच ट्रेंडिंग गाण्यावर नारकर जोडप्याने जबरदस्त एनर्जीसह डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

“आमच्या जीवनाचं एकच ध्येय आहे आनंदी राहून आयुष्य जगायचं” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघांच्याही हटके एक्स्प्रेशन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“बढिया, अविनाश खूप दिवसांनी रीलमध्ये आले”, “एक नंबर डान्स”, “अरे तुमची जोडी कमाल आहे खरंच…”, “तुमच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव खरंच कमाल आहेत”, “तुम्ही दोघेही मला खूप आवडता…असेच मस्त राहा”, “किती गोड कपल आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी नारकर जोडप्याचा डान्स व्हिडीओ पाहून दिल्या आहेत. अल्पावधीतच हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेनंतर काही वेळ अभिनेत्रीने ब्रेक घेतला आहे. त्या आता कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून भेटीला येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय अविनाश नारकर सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत पार्थ आणि जीवाच्या बाबांची भूमिका साकारत आहेत.