Aishwarya Narkar Dance On Tamil Song Video : ‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘श्रीमंताघरची सून’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. आजवर मराठी मालिका, नाटक, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. छोट्या पडद्यावर त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे.

उत्तम अभिनयाप्रमाणेच ऐश्वर्या नारकर नियमित योगा करून फिट राहण्याचा सल्ला नेहमीच त्यांच्या सर्व चाहत्यांना देत असतात. याशिवाय गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री त्यांच्या रील्स व्हिडीओमुळे देखील चर्चेत आहेत. सोशल मीडियावरील विविध ट्रेंडिंग गाण्यांवर ऐश्वर्या नारकर भन्नाट व्हिडीओ बनवतात. यामध्ये कधी त्यांना पती अविनाश नारकर, तर कधी मराठी कलाविश्वातील मैत्रिणींची साथ मिळते. मात्र, त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तामिळ गाण्यावर सोलो डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

“तुम तुम…” या तामिळ गाण्यावर ऐश्वर्या नारकरांनी जबरदस्त डान्स केला आहे. अभिनेत्रीने या तामिळ गाण्यावर डान्स करताना याची मूळ हूकस्टेप सुद्धा हुबेहूब फॉलो केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या नारकर काळ्या रंगाची सुंदर साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत.

ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओला “डान्स करताना आत्मविश्वास १०० टक्के आहे” असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “मस्तच मॅडम नादखुळा…”, “एकदम भारी डान्स केलाय”, “सुंदर डान्स”, “झकास डान्स केलाय मॅडम” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

‘ऐका दाजिबा’ गाण्यावर डान्स

दरम्यान, आणखी एका व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकरांनी ‘ऐका दाजिबा’ या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐश्वर्या नारकरांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता प्रेक्षक ऐश्वर्या नारकर नव्या मालिकेत केव्हा झळकणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.