Aishwarya Narkar on Avinash Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जातात. आजवर त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका अशा माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

ऐश्वर्या नारकर काय म्हणाल्या?

आता अभिनेत्री अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावरील रील्समुळेदेखील चर्चेत असतात. अनेकदा त्यांचे पती अविनाश नारकरदेखील या रील्समध्ये दिसतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या नारकर यांनी रील्सचे शूटिंग करताना त्यांच्यात अनेकदा भांडणे होतात, असे वक्तव्य केले.

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, एकत्र रील्स शूट कराताना काही गमतीजमती घडतात का? त्यावर अभिनेत्री म्हणाल्या की, आमची भांडणंच खूप होतात. डान्सच्या स्टेप्सवरून आमच्यात अनेकदा मतभेद असतात. पण, आम्ही एकमेकांना सहकार्य करीत डान्सचे शूटिंग करतो. या सगळ्यात टायमिंग सेट करावे लागते. टायमर लावून मागे येऊन अॅक्शन करावी लागते. तर, चिडचिडेपणाच्याच जास्त गमतीजमती होतात. काही वेळेला मला स्वत:लाच हसायला येतं की, आपण हे काय केलं आहे. हे कसं दिसत आहे, असं वाटतं.

ऐश्वर्या नारकर या त्यांच्या सोशल मीडियावरील रील्स, व्हिडीओमुळे मोठ्या चर्चेत असतात. त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंनादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो.

या मुलाखतीत त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय कधी घेतला. त्यांचे करिअर, विविध कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभवदेखील त्यांनी सांगितला. एका चित्रपटात एका सीनमध्ये त्यांनी अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “महेश टिळेकर दिग्दर्शित आधार नावाचा चित्रपट होता. जे आमचे निर्माते होते, तेच या चित्रपटात आमचे सहकलाकारदेखील होते. माझ्या नवऱ्याच्या भूमिकेत ते होते. अक्षय कुमार त्यांचा मित्र होता आणि मला वाटतं की, त्यावेळी महेश टिळेकरदेखील अक्षयला ओळखत होते. त्या एका सीनसाठी अक्षय कुमार आला होता.”

अक्षय कुमारबरोबर सीन करण्याची संधी मिळाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती? त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी, “मला छानच वाटलं होतं; पण भीती किंवा मी अतिउत्सुक अशा दोन्ही गोष्टी नव्हत्या. एकच सीन करायचा होता. त्यामुळे माझ्या मनात काहीही भीती नव्हती. मात्र, त्याच्याबरोबर काम करताना छान वाटलं होतं”, अशा भावना व्यक्त केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री आगामी काळात कोणत्या मालिका अथवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.