Aishwarya Narkar Fitness Secret : मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकार त्यांच्या सौंदर्यासह फिटनेसची विशेष काळजी घेतात. त्यांच्याप्रमाणे आपणही फिट असावं, असं अनेक चाहत्यांना वाटतं. ९० च्या दशकातील अनेक मराठमोळे कलाकार आजही निरोगी आरोग्यासाठी दररोज व्यायाम करतात. त्यातीलच एक मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. त्या सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहेत. ऐश्वर्या ४९ वर्षांच्या आहेत. मात्र, आजही त्यांचं सौंदर्य भल्या भल्या नवख्या आणि तरुण अभिनेत्रींना लाजवतं.

ऐश्वर्या नारकर इतक्या फिट आणि सुंदर कशा दिसतात, असा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल. त्याच्याच शंकानिरसनासाठी आपल्या चाहत्यांना त्यांनी याची माहिती दिली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हेही वाचा : लग्न मोडणार! ‘चारुलताचं सोंग घेतलं’ म्हणत भुवनेश्वरीने रडून मागितली जाहीर माफी, चारुहास संतापला अन् अधिपती…; पाहा प्रोमो

शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्या व्यायाम करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या मॅटवर उभ्या असून, आपले केस बांधत आहेत. तसेच सुरुवातीच्या काही स्टेप्स करत आहेत. व्यायाम करताना आपल्या शरीरात जास्तीत जास्त पाणी असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या या व्हिडीओत पाणी पितानाही दिसत आहेत. व्यायामाचा हा अगदी छोटा व्हिडीओ ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

व्हिडीओ पोस्ट करीत त्याला त्यांनी कॅप्शनही दिली आहे. त्यामध्ये त्यांनी “व्यायाम करणे कधीच थांबवू नका”, असं लिहिलं आहे. ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर त्या रोज काय व्यायाम करतात याचीही माहिती सांगितली आहे. व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या दररोज ४० स्क्वॅट्स मारतात, तसेच ४० सुमो स्क्वॅट्स मारतात. त्यानंतर त्या लगेचच २० बर्पीज करतात. तसेच २० ग्लूट्ससुद्धा करतात. शेवटी त्या २० क्रंचेस आणि २० जंपिंग जॅक्स करतात. या सर्व व्यायामाचे दररोज दोन सेट त्या करतात.

हेही वाचा : परदेसी गर्ल’ इरिना रुडाकोवा शिकतेय मराठमोळी लावणी; गोव्यात लगावले ठुमके, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दररोज असा व्यायाम करत असल्यानेच ऐश्वर्या नारकर आजही अगदी तिशीच्या आत असलेल्या तरुणींसारख्या दिसतात. ऐश्वर्या नारकर आणि त्यांचे पती अविनाश नारकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. मराठी मनोरंजन विश्वातील या जोडीने लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या दोघांचे अनेक रील्स व्हायरल होतात. त्यांची केमिस्ट्री पाहून चाहतेही त्यांचे भरभरून कौतुक करतात. तर, काही जण त्यांच्यावर टीकाही करतात.