प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(२६ मार्च) गळफास घेत जीवन संपवलं. ती २५ वर्षांची होती. तिच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून तिचे सहकलाकार, कुटुंबीय आणि चाहते यांना धक्का बसला आहे. आकांक्षाच्या आत्महत्येनंतर अनेक जण तिच्याबद्दल विविध कमेंट करताना दिसत आहेत. नुकतंच आकांक्षाची सहकलाकार आणि अभिनेत्री अक्षरा सिंहने याबद्दल संताप व्यक्त केला आहे. आकांक्षा दुबेच्या निधनानंतर विविध आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. यावर भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहने संताप व्यक्त केला आहे. तिने याबद्दल इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यावेळी तिने आकांक्षाबद्दल चुकीची बातमी पसरवणाऱ्यांवर संतप्त झाल्याचे दिसत आहे.आणखी वाचा : आकांक्षा दुबेने आत्महत्येपूर्वी ‘या’ अभिनेत्रीला केलेला मेसेज, म्हणालेली “दीदी तू…” अक्षरा सिंह काय म्हणाली? "वाईट माणसांनो, कृपा करुन एका मुलीचे निधन झाल्यानंतर तिला चुकीचे सिद्ध करु नका. तिचा जीव गेलाय आणि तुम्हाला त्यापेक्षा ती नशेडी होती हे जास्त महत्त्वाचं वाटतंय का? तिचा मृत्यू झालाय. जेव्हा ती जिवंत होती आणि लढत होती, तेव्हा ती खूप शहाणी आहे, असं म्हटलं गेलं, अशा भाषेत तिने सुनावले आहे. अक्षरा सिंहची प्रतिक्रिया तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल गंभीरता नाही. काही तरी लाज बाळगा. तुमच्या या गोष्टी ऐकण्यासाठी ती आता जिवंत नाही. पण किमान तिच्या आई-वडिलांवर तरी दया दाखवा, असेही तिने म्हटले. अक्षरा सिंहची प्रतिक्रिया अजून एक गोष्ट, एका मुलीने दुसऱ्या मुलीला चुकीचं बोलणं बंद करावं. काही क्षणाच्या सुखासाठी तुम्ही लोक त्या व्यक्तीला चूक बोलता. पण तेव्हा तुम्ही स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेताय याचा अंदाज तुम्हाला नसतो. एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या पाठिशी खंबीरपणे उभी असेल तेव्हा ही परिस्थिती नक्की बदलेलं. त्यामुळे या गोष्टी नीट समजून घ्या", असे अक्षरा सिंहने म्हटले आहे. अक्षरा सिंहची प्रतिक्रिया आणखी वाचा : Video : आकांक्षा दुबेने आत्महत्या करण्यापूर्वी केलेले इन्स्टाग्रामवर लाईव्ह, ढसाढसा रडून झालेली ‘अशी’ अवस्था दरम्यान आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आकांक्षा दुबेच्या आत्महत्येसाठी तिच्या आईने भोजपुरी गायक समर सिंहला जबाबदार धरलं आहे. समर आणि त्याच्या भावाने अभिनेत्रीची हत्या केल्याचा दावा अभिनेत्रीची आई मधू यांनी केला आहे. समर सिंह हा रविवारपासून बेपत्ता आहे. एसीपी सारनाथ ज्ञानप्रकाश राय यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींना अटक केली जाईल.