Bigg Boss Marathi 5 चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या पर्वाचे विजेतेपद सूरज चव्हाणने आपल्या नावावर केले आहे. प्रेक्षकांची मनं जिंकत सूरजने या पर्वाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू असल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरनेदेखील सूरज चव्हाणचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.

अक्षय केळकरने सूरज चव्हाणचे केले अभिनंदन

रितेश देशमुखने सूरज चव्हाणला बिग बॉस मराठी ५ चे विजेता घोषित केल्यानंतर सूरजचे सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता यामध्ये अभिनेता आणि बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरची भर पडली आहे. अक्षय केळकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर ‘विनर अभिनंदन’ असे लिहित सूरज चव्हाणला टॅग केले आहे.

अक्षय केळकर इन्स्टाग्राम

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा उपविजेता अभिजीत सावंत ठरला आहे. सूरज आणि अभिजीतमध्ये कोण विजेतेपद भूषवणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. तिसऱ्या स्थानावरुन निक्की तांबोळीला घराबाहेर जावे लागले. चौथ्या स्थानावर धनंजय पोवार घराबाहेर पडला तर पाचव्या स्थानावर अंकिता वालावलकर घराबाहेर पडली. तर जान्हवी किल्लेकरने ९ लाखांची रक्कम घेत सहाव्या स्थानावरून बिग बॉसच्या घराबाहेर जाणे पसंत केले.

हेही वाचा: लहानपणी आई-वडिलांचं निधन, सख्ख्या ५ बहिणी अन्…;Bigg Boss विजेत्या सूरज चव्हाणचा संघर्षमय प्रवास, जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सूरज चव्हाणच्या विजयानंतर प्रेक्षकांना आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेटकरी सोशल मीडियावर सूरजचे अभिनंदन करत आहेत. बिग बॉस मराठी ५ व्या पर्वाची पहिल्या दिवसापासून चर्चा झाली. बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांपासून ते पहिल्यांदाच या शोच्या सूत्रसंचालकाची जबाबदारी सांभाळत असलेल्या रितेश देशमुखपर्यंत सगळेच चर्चेचा विषय होते. या सगळ्यामध्ये सूरज चव्हाणने आपल्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा साधेपणा प्रेक्षकांना आवडल्याचे दिसले. आता बिग बॉस मराठीच्या शोनंतर सूरज चव्हाणची वाटचाल पुढे कशी असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.