scorecardresearch

कपाळी टिळा, खांद्यावर पदर; राणादा-पाठकबाई नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या चरणी, लग्नानंतर करताहेत देवदर्शन

अक्षया देवधर व हार्दिक जोशी लग्नानंतर देवदर्शन करत आहेत. यादरम्यानचेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कपाळी टिळा, खांद्यावर पदर; राणादा-पाठकबाई नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या चरणी, लग्नानंतर करताहेत देवदर्शन
अक्षया देवधर व हार्दिक जोशी लग्नानंतर देवदर्शन करत आहेत. यादरम्यानचेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हार्दिक जोशी व अक्षया देवधर हे नवं विवाहित जोडपं सध्या चर्चेत आहे. हार्दिक-अक्षयाने त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. या दोघांच्या शाही विवाहसोहळ्याचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अजूनही हार्दिक व अक्षयाचे हळदी, संगीत व लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

आणखी वाचा – लग्नानंतर नाशिकला पोहोचले राणादा-पाठकबाई, अक्षया देवधरच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष

लग्नानंतर हार्दिक व अक्षया कॉफी डेटसाठी गेले होते. लग्नानंतरची ही त्यांची पहिलीच कॉफी डेट होती. त्यानंतर हार्दिक अक्षयाला घेऊन रोड ट्रिपसाठी गेला. यादरम्यानचा व्हिडीओ अक्षयाने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता.

आता हे नवविवाहित जोडपं नाशिकला पोहोचलं आहे. लग्नानंतर हार्दिक व अक्षया देवदर्शन करत आहेत. नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीचं दोघांनी दर्शन घेतलं आहे. यादरम्यानचे फोटो अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

आणखी वाचा – Video : राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची क्रेझ काही संपेना, नवऱ्यासाठी गायलं रोमँटिक गाणं, हार्दिकही भारावला अन्…

अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघांनीही कपाळी टिळा लावलेला दिसत आहे. तसेच अक्षयाने खांद्यावर पदर घेतलेला आहे. हार्दिकने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर अक्षयाने पारंपरिक साडी परिधान केली असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 14:08 IST

संबंधित बातम्या