‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे नावारुपाला आलेली जोडी म्हणजे अक्षय देवधर व हार्दिक जोशी. त्यांनी या मालिकेमध्ये साकारलेलं राणादा आणि पाठकबाई हे पात्र तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आलं आहे. शुक्रवारी (२ डिसेंबरला) या दोघांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. सध्या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु आहे. यादरम्यानचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – Akshaya Hardeek Wedding : राणादाला लागली हळद, पाठकबाईंच्या हातावर सजली मेहंदी, होणाऱ्या नवरीचा उत्साह एकदा पाहाच

अक्षयाने तिच्या मेहंदी कार्यक्रमाचे काही व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले. तिने या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता. शिवाय तिची मेहंदीही अगदी आकर्षक आहे. वधू, प्रपोज करतानाचं एक जोडपं व सप्तपदी अशी तिच्या मेहंदीची डिझाइन आहे.

अक्षयाने आता तिच्या नेल आर्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने तिच्या लग्नासाठी खास नेल आर्टही करुन घेतलं आहे. तिच्या नखांवर एका लग्नाची तारीख २ डिसेंबर लिहिण्यात आली आहे. तर दुसऱ्या नखावर ‘हॅशटॅग अहा’ असं लिहिण्यात आलं आहे.

आणखी वाचा – Akshaya Hardeek Wedding : ‘हळद लागली, हळद लागली…’ नवरदेव बसला पाटावर, हार्दिक जोशीच्या हळदी कार्यक्रमाची खास झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच अक्षयाच्या नखांवर सुंदर डिझाइन करण्यात आलं आहे. काही महिन्यांपूर्वीच अक्षया व हार्दिकचा साखरपुडा पार पडला. पुण्यामध्ये थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. तसेच काही मराठी कलाकारही या दोघांच्या विवाहसोहळ्या उपस्थित राहणार आहेत.