मराठी अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी २ डिसेंबरला लग्न केलं. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील लोकप्रिय रील लाइफ जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकली. लग्नानंतर या दोघांनी हळदी, मेहंदीपासून ते देवदर्शनापर्यंत बरेच फोटो शेअर केले आहेत.

अक्षया देवधरने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तिच्या फोटोशूट कॉर्डिनेरचे आभार मानले आहेत. अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नातील सर्व विधीच्या फोटोशूटचं सर्व मॅनेजमेंट हे कलासी स्टुडिओने केलं होतं. या स्टुडिओची ओनर अमृताने या लग्नात खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासाठी अक्षयाने तिचं कौतुक करत तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

आणखी वाचा- Video: “जरीच्या साडीत…” लग्नानंतर अक्षयाने पहिल्यांदाच शेअर केला व्हिडीओ; नववधूच्या साजश्रृंगाराची दिसली झलक

अक्षयाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “अमृता… तुझ्याबद्दल किती आणि काय लिहू? तू डार्लिंग आहेस! तुझा, या सगळ्याशी, खरंतर काहीच संबंध नव्हता पण तरीही तू या दिवसात जी काही मदत केली आहेस, धावपळ केली आहेस, त्याचे आभार मी आणि हार्दिक शब्दात नाही मानू शकत. जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका तू खरच खूप मनापासून बजावलीस, कसलीच अपेक्षा न करता. खूप धन्यवाद! खूप सारं प्रेम!”

आणखी वाचा- आमंत्रण की, निमंत्रण? अर्थामध्ये नेमका फरक काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकल्याने चाहतेही आनंदी आहेत. अक्षया-हार्दिकच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.