Friendship Day 2024 : दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑगस्टच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन अर्थात फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं अलगद फुलणारं आणि एकदा फुलून झालं की, जन्मभर गंध देत झुलणारं असतं. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचं नातं असतंच. कधी वाद झाले तरी मैत्री हे नातं कायम टिकणार असतं. आज सर्वत्र मैत्री दिन साजरा केला जात आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी खास पोस्ट लिहिताना दिसत आहेत. बऱ्याच कलाकार मंडळींनी देखील आपल्या खास मित्र-मैत्रिणींसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतील अर्जुन सुभेदार म्हणजे अभिनेता अमित भानुशालीने ( Amit Bhanushali ) मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्याने ‘स्टार प्रवाह’ परिवारातील चांगल्या आणि खास मित्राचा देखील खुलासा केला आहे.

‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अभिनेता अमित भानुशालीचा ( Amit Bhanushali ) व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अमित म्हणतोय, “‘स्टार प्रवाह’च्या परिवारात सगळेच माझे मित्र आहेत. मी सगळ्यांना ओळखतो. शशांक केतकर असू दे, अभिषेक असू दे किंवा अक्षर कोठारी असू दे. पण माझा ‘स्टार प्रवाह’ परिवारातील चांगला मित्र जर तुम्ही म्हणाल तर तो रणजीत जोग आहे. एक कमाल गोष्ट आहे. आम्ही एकत्र एक मालिका करत होतो. त्या मालिकेत तो माझा मोठा भाऊ होता आणि मी पहिल्यांदा जेव्हा सेटवर गेलो होतो. त्यावेळेस लूक टेस्ट की मॉक शूटिंग सुरू होतं. तेव्हा मी खूप अटिट्यूडमध्ये होतो आणि तो खूप साधेपणाने मला सांगत होतो की, तुझं काम मी खूप बघितलं आहे. तू खूप छान काम करतोस. त्यामुळे माझं असं झालं की, मग मी का एवढा अटिट्यूड देतोय. एका मलिका निमित्ताने आम्ही वर्षभर एकत्र होता. आजपर्यंत खूप चांगले मित्र आहोत. मित्रपेक्षा म्हणणे आम्ही एक कुटुंबच आहोत.

हेही वाचा – Video: “तेरी मेरी यारिया…”, ‘बिग बॉस मराठी’ विजेती मेघा धाडेची फ्रेंडशिप डेनिमित्ताने ‘यांच्या’साठी खास पोस्ट, सई किंवा पुष्कर नव्हे तर…

Amit Bhanushali

पुढे अमित ( Amit Bhanushali ) म्हणाला, “त्याचा सर्वात चांगला गुण म्हणजे आयुष्यात कुठलीही समस्या आली, काहीही झालं. तरी तो नेहमी तुमच्याबरोबर असतो. माझ्याबरोबर तो नेहमीच राहिला आहे. आयुष्यात कितीही उतार-चढाव येऊ द्या. मग ते वैयक्तिक असो किंवा कामासंदर्भात माझी कुठलीही समस्या मी डोळे झाकून त्याला सांगू शकतो.”

“तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेचा खूप साऱ्या शुभेच्छा. सगळेच मित्र आहेत. खूप छान आहेत. सगळ्यात चांगला मित्र आपल्या आयुष्यात जे आहेत ते आपले आई-वडील आहेत. त्यानंतर तुमचा आयुष्यभराचा जोडीदार जो असेल तो तुमचा चांगला मित्र असतो”, असं म्हणत पुन्हा एकदा अमितने ( Amit Bhanushali ) चाहत्यांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – अजय देवगण-तब्बूच्या ‘औरों में कहां दम था’ चित्रपटाची दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई, ‘इतक्या’ कोटींचा जमवला गल्ला

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित भानुशालीचा चांगला मित्र ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ मालिकेत करतोय काम

दरम्यान, अमित भानुशालीचा ( Amit Bhanushali ) चांगला मित्र अभिनेता रणजीत जोग सध्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत सार्थकचा भाऊ आदर्शची भूमिका रणजीतने साकारली आहे.