Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने जुलै महिन्यात रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. यानंतर त्यांचे चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही ‘बिग बॉस’ फेम जोडी आज (१८ नोव्हेंबर २०२१ ) विवाहबंधनात अडकली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यात घट्ट मैत्री झाली. त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यामुळे ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून प्रेक्षकांकडून सध्या आनंद व्यक्त करण्यात येत आहे. प्रसाद-अमृताने त्यांच्या लग्नातील खास क्षण व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रसाद-अमृताने लग्नात सप्तपदी घेताना खास मराठमोळा लूक केला होता. अभिनेत्रीने गुलाबी रंगाची भरजरी साडी, नाकात नथ, गळ्यात दागिने, कपाळी चंद्रकोर असा खास लूक करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. प्रसादनेही बायकोला साजेसं असं पिवळ्या रंगाचं पितांबर लग्न लागताना नेसलं होतं. “आमच्या आयुष्यातील जादुई दिवस १८/११/२०२३” असं कॅप्शन देत अमृताने त्यांच्या लग्नातील खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल आहे.

Marathi Actress Prajakta Mali glamorous photoshoot viral
“नुसता जाळ अन् धूर…”, प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले, “हाय गर्मी”
actor Gaurav S Bajaj welcomes baby girl
लोकप्रिय अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म, आनंद व्यक्त करत म्हणाला, “चैत्र नवरात्रीत…”
shweta shinde recall college days memories and connection with kareena kapoor and vivek oberoi
मराठमोळ्या श्वेता शिंदेचं शाहिद कपूर, विवेक ओबेरॉय अन् करीनाबरोबर आहे खास कनेक्शन; म्हणाली, “हे कलाकार तेव्हा…”
amravati, navneet rana, sanjay khodke
नवनीत राणांच्‍या प्रचार फलकांवरील संजय खोडकेंचे छायाचित्र हटविले

प्रसाद-अमृताच्या लग्नातील असंख्य कलाकारांनी हजेरी लावली होती. नम्रता संभेराव, प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर असे बरेच मराठी कलाकार या जोडप्याला वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. त्यांच्या लग्नातील या खास व्हिडीओवर दोघांचेही चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : अमृता देशमुख-प्रसाद जवादे लग्नबंधनात अडकले, दोघांचा पहिला फोटो आला समोर, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

हेही वाचा : Video : ‘झिम्मा २’च्या कलाकारांनी सेटवर ‘अशी’ केली धमाल, ‘मराठी पोरी’ गाण्याचा पडद्यामागचा व्हिडीओ पाहिलात का?

दरम्यान, प्रसाद अमृताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अमृता पुण्याची टॉकरवडी म्हणून प्रसिद्ध आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यावर तिने रेडिओ जॉकी म्हणून प्रवास सुरू केला. याशिवाय प्रसाद जवादेने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं असून शेवटचा तो ‘काव्यांजली’ मालिकेत झळकला होता.