Television Actress Talks About Motherhood : अनेकदा प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर करिअरमधून ब्रेक घेताना दिसतात. मुलांचं संगोपण करता यावं, त्यांना वेळ देता यावा यासाठी त्या काही काळ कामातून ब्रेक घेत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, पुन्हा कामाला सुरुवात केल्यानंतर मुलाला घरी ठेवून बाहेर कामावर जाणं हे त्यांच्यासाठी खूप कठीण असतं. अशाच एका प्रसंगावर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने तिचं मत व्यक्त केलं आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनिता हसनंदानी हिने मुलाच्या जन्मानंतर कामातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. याबाबत तिने नुकतच ‘फिल्मी ग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. या मुलाखतीदरम्यान तिचा नवरा रोहित रेड्डीने तिच्यासाठी एक भावनिक मॅसेज पाठवला होता. तो मॅसेज ऐकल्यानंतर अनिताला रडू कोसळल्याचं या मुलाखतीमध्ये पाहायला मिळालं.
अनिता हसनंदानी ही ‘ये हैं मोहब्बतें’ या मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झाली होती. मुलाच्या जन्मानंतर तिने काही काळ अभिनयापासून विश्रांती घेतली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सविस्तर सांगितलं आहे. या मुलाखतीदरम्यान तिच्या पतीने (रोहित रेड्डीने) तिला एक भावनिक मॅसेज पाठवला होता, तो ऐकून अनिताला अश्रू अनावर झाले.
अनिता म्हणाली, “मी जेव्हा माझ्या मुलाला घरी ठेवून शूटिंगला जाते, माझ्यासाठी ती खूप मोठी आणि कठीण गोष्ट आहे. अशा वेळी रोहितने मला दिलेला पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एक आईच जाणू शकते की, मुलाला सोडून बाहेर जाणं किती वेदनादायक असतं.”
अनिताने आजवर ‘ये हैं मोहब्बतें’, ‘गुटर गू’, ‘कसम से’, ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘करम अपना अपना’, ‘त्रीदेवियां’, ‘कयामत’, ‘एक हजारों में मेरी बेहना है’ आणि ‘नागीन’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे