‘बिग बॉस १७’ व ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने एक दुःखद बातमी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली आहे. तिच्या पाळीव श्वानाचं निधन झालंय. या श्वानाचं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी खास कनेक्शन होतं. अंकिताने लाडक्या स्कॉचचे फोटो शेअर करत त्याच्या निधनाची माहिती दिली.

अंकिता लोखंडेने सोमवारी सांगितलं की तिचा पाळीव कुत्रा स्कॉच मरण पावला आहे. हा कुत्रा तिला तिचा एक्स बॉयफ्रेंड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने भेट म्हणून तिला दिला होता. अंकिताने इन्स्टाग्रामवर स्कॉचचा एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, “Hey buddy, मम्माला तुझी खूप आठवण येईल. रेस्ट इन पीस स्कॉच.”

“तो माझ्या घरी आला अन्…”, जुही चावलाला आमिर खानने दिलेलं सर्वात स्वस्त गिफ्ट; म्हणाली, “घरातील सर्वजण…”

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दोघे एकत्र काम करत असताना सुशांतने अंकिताला स्कॉच गिफ्ट केला होता. तेव्हा स्कॉच हा खूप लहान होता. अंकिताने ही पोस्ट शेअर केल्यावर तिच्या काही चाहत्यांनी स्कॉच व सुशांतच्या आठवणी कमेंट केल्या. “मला आठवतं की पवित्र रिश्ता दरम्यान तिला सुशांतने स्कॉच भेट म्हणून दिला होता. सुशांत आणि तिच्या भावना स्कॉचशी जोडल्या गेल्या होत्या,” अशी कमेंट एका चाहत्याने केली. दरम्यान, काही चाहत्यांनी सुशांतचा कुत्रा फजची आठवण काढली. “स्कॉच आणि फज आता एकत्र आहेत आणि तुम्हाला पाहत आहेत,” असं लिहिलं.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची लेक होणार जान्हवी कपूरची सासू? शिखर पहारियाच्या आईचं मराठी मालिकाविश्वाशी आहे खास कनेक्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिताचा पती विकी जैन यानेही त्यांच्या लाडक्या स्कॉचच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याने सोशल मीडियावर लिहिलं, “तुझी आठवण येईल, स्कॉच.” दरम्यान, अंकिता ‘बिग बॉस १७’ च्या टॉप पाच फायनलिस्टपैकी एक होती. या शोमध्ये ती पती विकी जैनबरोबर सहभागी झाली होती. पुढे अंकिता रणदीप हुड्डासह ‘वीर सावरकर’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २२ मार्चला रिलीज होणार आहे.