छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. प्रत्येक स्पर्धेकाने आपल्या खेळीवर वेगळा प्रेक्षकवर्ग बनवला आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे ही पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. या शोमध्ये अनेकदा ती तिचा दिवंगत एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसते. दरम्यान, अंकिताने सुशांत तिच्याबरोबर कसा वागायचा याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- प्रसिद्ध अभिनेत्याने शेजाऱ्याच्या कुटुंबावर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, झाडामुळे झालेला वाद

बिग बॉसच्या घरात अंकिताने अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांच्याशी बोलताना सुशांतबरोबरची एक आठवण सांगितली आहे अंकिता म्हणाली “जेव्हा सुशांतचा पहिला चित्रपट ‘काई पो चे’ रिलीज झाला होता. त्यावेळी मी खूप रडले होते. मला त्याचा खूप अभिमान वाटत होता. या चित्रपटासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती. सुशांतचा एमएस धोनी २ वर्षांसाठी पुढे ढकलला होता. या दोन वर्षांत त्याने खूप मेहनत केली. आम्ही रात्रभर पार्टी करायचो, मी झोपायला जायचे पण तो सकाळी ६ वाजल्यापासूनच क्रिकेट खेळायला जायचा. दोन वर्षे त्याने खूप क्रिकेट खेळलं. तो खूप मेहनती होता,”

दरम्यान सुशांत तिच्याबरोबर कसा वागायचा याबाबतही अंकिताने खुलासा केला अंकिता म्हणाली, “आम्ही सात वर्षे एकत्र होतो. पण या ७ वर्षात त्याने कधीही माझ्याबरोबर कधीच गैरवर्तन केले नाही. आमच्यात वाद व्हायचे पण आमच्यात कधीच मोठे भांडण झाले नाही.”

हेही वाचा-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात अंकिताने सुशांतबरोबरच्या ब्रेकअप भाष्य केलं होतं. तिचं व सुशांतच ब्रेकअप का झालं यामागचं कारण अंकिताने सांगितलं होतं. ती म्हणालेली “सुशांत एका रात्रीत बदलला. एकीकडे त्याला यश मिळत होतं; तर दुसरीकडे लोक त्याचे कान भरत होते. मला सुशांतच्या डोळ्यांत ते प्रेम दिसतच नव्हतं.”