‘बिग बॉस १७’चा ग्रँड फिनाले २८ जानेवारीला पार पडला. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीला यंदाच्या बिग बॉसचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले. मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण माशेट्टी यांनी टॉप पाचमध्ये मजल मारली होती. मात्र, टॉप चारमधूनच अंकिता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडली. अंकिताच्या या एविक्शनने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

एकीकडे यंदाचे ‘बिग बॉस’ अंकिताच जिंकणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे तिला टॉप तीनमध्ये स्थान मिळवता आले नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर अंकिता नाराज झाल्याचे दिसून येत होती. बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यानंतरचे अंकिताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता ‘बिग बॉस’ संपल्यानंतर अंकिताने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- ‘बिग बॉस १७’ तून कोट्यवधी कमावले, जाणून घ्या मुनव्वर फारुकीची एकूण संपत्ती अन् कार कलेक्शन

अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘बिग बॉस १७’च्या ग्रँड फिनालेच्या रात्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पोस्टमध्ये अंकिताने सलमानचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये सलमान “अंकिता यंदाच्या बिग बॉस सीझनची विजेता होईल असे वाटत असतानाही तिला बाहेर काढण्यात आले तेव्हा धक्का बसला”, असे म्हणताना दिसत आहे. तसेच सलमानने अंकिताची तुलना बिग बॉसची माजी स्पर्धक प्रियंका चहर चौधरीशी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिताने पोस्टमध्ये बिग बॉसच्या प्रवासातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत तिने लिहिले “ही होती ‘बिग बॉस’मधील शेवटची रात्र. हा प्रवास कायम लक्षात राहणारा आणि आनंद देणारा असेल! सलमान खानचेही आभार. मला ही संधी दिल्याबद्दल कलर्स, जिओ सिनेमाचेही आभार.” अंकिताची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.