Sairaj Kendre Won Hearts Fans Of His Cute Expression: सोशल मीडियाच्या माध्यमातून लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकजण आज लोकप्रिय झाले आहेत. अनेकजण त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांचा चाहतावर्ग मोठा असल्याचे दिसते.

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यामुळे बालकलाकार साईराज केंद्रे घराघरांत पोहोचला. त्यानंतर तो झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिम्बा उर्फ अमोल ही भूमिका त्याने साकारली होती. त्याने त्याच्या सहज अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. आता ही मालिका संपली असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून साईराज केंद्रे प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

“बाई सुया घे गं…”, गाण्यावर साईराज केंद्रेने शेअर केले रील

नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये साईराज केंद्रेने ‘बाई सुया घे गं दाबण घे’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्याचा पोशाख तसेच त्याचा लूक लक्ष वेधून घेत आहे. साईराजने केसांचा मधून भांग पाडला आहे. कपाळावर कुंकवाचा टिळा लावला आहे. त्याच्या गळ्यात तुळशीची माळदेखील दिसत आहे. साईराजसमोर एक गाठोडे दिसत आहे. विशेष बाब म्हणजे, गाण्याच्या बोलानुसार तो त्याच्या चेहऱ्यावरील, तसेच डोळ्यांचे हावभाव बदलताना दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “कडक छोटा अमोल”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “साई एक नंबर अभिनय”, आणखी नेटकऱ्याने लिहिले, “एकच नंबर”, एका नेटकऱ्याने साईराजचे कौतुक करत लिहिले, “भविष्यात तू मोठा कलाकार होशील”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप भारी सिम्बा”, अशा अनेक कमेंट करत चाहत्यांनी साईराज केंद्रेचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. काहींनी हॉर्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

साईराज नेहमीच त्याच्या क्यूट अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतो. सोशल मीडियावर तो गाणी, रील्स, डान्स या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने ‘एक नंबर, तुझी कंबर’ या गाण्यावर डान्स केला होता. त्याच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांनी त्याचे प्रचंड कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील साईराज केंद्रेने त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. बालकलाकार म्हणून त्याला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले. आता तो पुन्हा कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.