‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. झी मराठी वाहिनीवरील ही मालिका अगदी कमी वेळातच प्रसिद्ध झाली आणि अप्पी हे पात्र घराघरांत पोहोचलं.

अप्पी आणि अर्जुनची जोडीदेखील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. अशातच आता आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेला साईराज म्हणजेच सिंबाची सात वर्षांनी एन्ट्री झालीय. सिंबा म्हणजेच अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोल.

हेही वाचा… “जिंदगी का इतना भी तमाशा…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापला घ्यायला आला इम्तियाज अली; अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट

अमोल आल्यानंतर या मालिकेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आलाय. ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. मॉं आणि सिंबाचं ऑन स्क्रिन बॉन्डिंग जसं घट्ट आहे, तसंच ऑफस्क्रिन साईराज आणि शिवानीचं नातं आहे. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर रिल्स शेअर करत असतात. नुकतीच दोघांनी एक मजेशीर रील शेअर केली आहे. या रीलमध्ये दोघांनी प्रसिद्ध कार्टून ‘शिनचेन’च्या आवाजात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अप्पीने सिंबाला उचलून घेतलंय आणि तेवढ्यात सिंबा अप्पीला म्हणतो, “तुम तो मुझसे भी क्यूट हो”; यावर अप्पी म्हणते, “नही नही, तुम मुझसे ज्यादा क्यूट हो.” यावर सिंबा जबरदस्त रिप्लाय देत म्हणतो, “तुम सही कह रहे हो.”

हेही वाचा… “सन सनन…”, २३ वर्षानंतर व्हायरल झालेल्या अशोका ट्रेंडबद्दल करीना कपूर म्हणाली, “तेव्हा माझ्या चेहऱ्यावर…”

अप्पी आणि सिंबाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अप्पी आणि सिंबाच्या चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट्सदेखील केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “असं वाटतं की हा अर्जुन अप्पीचाच मुलगा आहे.” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं की, “सिंबा जास्त क्यूटआहे.” अनेकांनी अप्पी आणि सिंबाच्या जोडीचं कौतुक केलंय.

हेही वाचा… “अतिशय वेगळा असा आळस…”, ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने शेअर केला गणीबरोबर ‘खास’ व्हिडीओ; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत लवकरच मोठा ट्विस्ट येणार आहे. सध्या अर्जुनचा साखरपुडा नुकताच पार पडलाय आणि सिंबाला त्याचा मास्टरच खरा शेहेनशा आणि त्याचा बाबा आहे हेही कळलंय. आता सिंबाच अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणणार असं दिसतंय. अप्पी आणि अर्जुन एकत्र येण्याची प्रेक्षक वाट पाहतायत. पुढे नेमकं काय घडेल हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल.