छोट्या पडद्यावर सध्या सर्वाधिक चर्चेत अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. ती बिग बॉसमुळे चर्चेत असते. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. यात तिने शेवंता हे पात्र साकारले होते. बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अपूर्वा नेमळेकरचा उद्या (२७ डिसेंबर) वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त तिने बिग बॉसच्या घरात एक किस्सा सांगितला आहे.  

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या वाढदिवसाबद्दल सांगितले आहे. यावेळी तिने माझ्या वाढदिवसाला काहीही स्पेशल घडत नाही, अशी खंतही व्यक्त केली. हे बोलताना ती भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.  
आणखी वाचा : प्रेम, लग्न, घटस्फोट; ‘बिग बॉस’मुळे चर्चेत असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का?

“माझा वाढदिवसाला कधीच काही स्पेशल घडत नाही. मी वाढदिवशी कायमच रडते. का, कशासाठी माहिती नाही, पण हे दर वाढदिवशी होतं. माझ्या वाढदिवसाला स्पेशल असं काही घडलेलं नाही. मी वाढदिवसाच्या वेळी काहीही करत नाही.

मी त्या दिवशी कायम घरी असते. त्यानंतर मग आम्ही बाहेर जेवायला जातो. दुपारी किंवा रात्री कुटुंबाबरोबर जेवायला जातो. दुपारी घरीच जेवतो, बहुतांश वेळा रात्री जेवायला जातो”, असे अपूर्वाने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “अपूर्वाकडून काहीतरी शिकून घे…” अमृता धोंगडेच्या वडिलांनी दिला सल्ला, प्रसादची नक्कल करत उडवली खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बिग बॉस मराठी ४ चा ग्रँड फिनाले येत्या ८ जानेवारी २०२३ ला संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण कलर्स मराठी वाहिनीने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.