गोविंदाची भाची व लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंह २५ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. ती दिपक चौहानशी अरेंज मॅरेज करत आहे. ३९ वर्षांची आरती आपल्या आयुष्यातील नवीन प्रवासासाठी खूप उत्सुक आहे. तिने लग्नाच्या एका आठवड्याआधी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले.

कॉमेडियन व अभिनेता कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह बिझनेसमन दिपक चौहानशी लग्न करतेय, तो नवी मुंबईचा आहे. लग्नाआधी आरती काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. तिने लग्नाची पत्रिका मंदिरात ठेवली व देवाचे आशीर्वाद घेतले. तिचे काही फोटो पापाराझी अकाउंट्सवरून शेअर करण्यात आले आहेत.

“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”

‘इन्स्टंट बॉलीवूड’ने शेअर केलेल्या फोटोंमध्ये आरती लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. ती मंदिरात पत्रिका हातात घेऊन उभी आहे. पत्रिकेत मोठ्या अक्षरात लिहिलेली तिची व दिपकची नावं दिसत आहेत. अभिनेत्रीने लग्नाआधी देवाचे आशीर्वाद घेतले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

“मी घटस्फोटानंतरही पहिल्या पत्नीवर अंत्यसंस्कार केले”, हंसल मेहतांचा खुलासा; मुलींच्या जन्मानंतर सफीनाशी दोन वर्षांपूर्वी केलं लग्न

आरती सिंहने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिचं सजलेलं घर पाहायला मिळतंय. घर आकर्षक विद्यूत रोषणाने सजवल्याचं फोटोत दिसतंय. लग्नाला आता १० दिवस बाकी आहेत, असं कॅप्शन आरतीने या फोटोला दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरती व दिपक यांचं अरेंज मॅरेज आहे. ते गेल्या वर्षी जुलैमध्ये भेटले होते, त्यानंतर त्यांनी एकत्र वेळ घालवला आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच तिच्या लग्नाची तारीख जाहिर केली. ती व दिपक २५ एप्रिलला लग्न करणार आहेत.