'शार्क टँक इंडिया २' मधून वगळण्यावर अशनीर ग्रोव्हरची प्रतिक्रिया; म्हणाला "तुमची लायकी..." | ashneer grover gives first reaction on his absence in shark tank india season two | Loksatta

“तुमची लायकी…” ‘शार्क टँक इंडिया २’ मधून वगळल्यानंतर अशनीर ग्रोव्हरची प्रतिक्रिया

‘रेड एफएम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुद्द अशनीरने याविषयी वक्तव्य केलं आहे

“तुमची लायकी…” ‘शार्क टँक इंडिया २’ मधून वगळल्यानंतर अशनीर ग्रोव्हरची प्रतिक्रिया
अशनीर ग्रोव्हर (सोशल मीडिया)

छोट्या पडद्यावरील ‘शार्क टँक इंडिया’ या रीयालिटि शोला लोकांनी चांगलीच पसंती दर्शवली. नवीन बिझनेसच्या संकल्पनेत पैसे गुंतवण्याच्या या नव्या स्पर्धेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. परदेशात हा कार्यक्रम हीट ठरला, पण भारतात या कार्यक्रमाची क्रेझ निर्माण झाली ती अशनीर ग्रोव्हर या परीक्षकामुळे. पहिल्या सीझनमधल्या शार्क्सपैकी अशनीरने शार्कने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला.

त्याचं सडेतोड बोलणं, भूमिका घेणं, नावडत्या गोष्टीला थेट नकार देणं, त्याचा फटकळ स्वभाव यामुळे तो ‘शार्क टँक इंडिया’चा सर्वात जास्त चर्चेत असणारा शार्क बनला. त्याच्या वेगवेगळ्या कॉमेंटची मिम्सदेखील प्रचंड व्हायरल झाली होती, पण जेव्हा‘शार्क टँक इंडिया’च्या दुसऱ्या सीझनमध्ये अशनीर दिसणार नसल्याचं समजल्यावर त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले. त्यांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाला ट्रोल कारायला सुरुवात केली. अशनीरशिवाय या कार्यक्रमाला अर्थ नाही असं म्हणत चाहत्यांनी टीका केली.

आणखी वाचा : “मी घरोघरी जाऊन…” शाळेत नापास झाल्यावर मधुर भांडारकर यांनी केला ‘हा’ व्यवसाय; दिग्दर्शकाने सांगितली आठवण

नुकतंच ‘रेड एफएम’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुद्द अशनीरने याविषयी वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये अशनीरने नेहमीप्रमाणेच त्याच्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिलं आहे. कार्यक्रमाच्या निर्मात्यांना अशनीरला घेणं परवडत नसल्याने त्यांनी या दुसऱ्या सीझनमध्ये त्याला वगळल्याचं समोर आलं आहे. यावर अशनीरने हसत उत्तर दिलं की, “परवडण्यासाठी फक्त पैसेच नाही तर तुमची लायकीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते.”

अशनीर त्याच्या लग्झरी लाईफास्टाईलमुळे आणि वादग्रस्त कोर्टकेसमुळे चर्चेत होता. आता या नवीन सीझनमध्ये तो नसल्याने प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत.कार्यक्रमाच्या पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सीझनमध्ये देखील ‘शादी डॉट कॉम’ची को-फाऊंडर अनुपम मित्तल, ‘बोट’ कंपनीचे को-फाऊंडर अमन गुप्ता,‘लेंस्कार्ट’चे संस्थापक पीयुष बंसल असे जून शार्क्स या दुसऱ्या सीझनमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडतील. अशनीर ऐवजी ‘कार देखो’ ग्रुपचे सीईओ अमित जैनच दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 13:26 IST
Next Story
Akshaya Hardeek Wedding : ‘हळद लागली, हळद लागली…’ नवरदेव बसला पाटावर, हार्दिक जोशीच्या हळदी कार्यक्रमाची खास झलक