‘शार्क टँक इंडिया’च्या पहिल्या पर्वाचा शार्क अश्नीर ग्रोव्हर सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. शोमध्ये त्याच्या अनोख्या शैलीने त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर काही कारणास्तव तो दुसऱ्या पर्वामध्ये सहभागी झाला नव्हता. मात्र सोशल मीडियावर तो सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या अश्नीर एका ट्वीटमुळे चर्चेत आहे.
अश्नीर ग्रोव्हरने त्याच्या मुलाबद्दलचं एक ट्वीट केलं आहे. मुलगा परीक्षा पास झाल्यावर अश्नीर त्याला हाय कोर्टात घेऊन गेला. त्याने स्वतःच ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. त्याने मुलाबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. “तुमचा मुलगा पास होऊन पुढच्या वर्गात जातो तेव्हा तुम्ही त्याला कुठे घेऊन जाता? मी त्याला सर्वात आधी हाय कोर्टात नेतो आणि नंतर पार्टी देतो. अविचे अभिनंदन” असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अश्नीरच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्या मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ‘शार्क टँक इंडिया’मुळे अश्नीर ग्रोव्हर खूप लोकप्रिय झाला होता. तो त्याच्या रागीट स्वभावामुळे प्रसिद्ध होता. त्याच्यावर खूप मीम्स बनवण्यात आले होते. तो ‘शार्क टँक इंडिया’च्या दुसऱ्या पर्वाचा भाग नव्हता.