प्रेक्षकांना कलाकारांचे काम जितके आवडते तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी देखील चाहत्यांच्या मनात घर करत असतात. आता अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. अश्विनी महांगडेने आई कुठे काय करते सहकलाकार कौमुदी वालोकर व तिच्या आई-वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

अश्विनीने हा फोटो शेअर करताना लिहिले, “अचानक आयुष्यात माणसं येतात आणि त्यांच्या मनात फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच सामावून घेतात. अगदी तसेच तुम्ही तिघेही माझ्या आयुष्यात आलात. कळत नकळत माहित नाही पण जे नाते जुळून आले त्याचा मला आदर आहे. आता मी आहे कायम. माझे तुम्हा तिघांवर खूप प्रेम आहे. विषय संपला. ही फार मोठी जबाबदारी, कर्तव्य, प्रेम, आदर आहे पण मी जपणार आहे”, असे म्हणत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तिच्या या पोस्टवर कौमुदीच्या आईने कमेंट करत लिहिले, “खूप आर्शिवाद, प्रेम, सगळंच मोठी हो” तर कौमुदीच्या वडिलांनी लिहिले, “आयुष्यात चांगली माणसं, गोड प्रेमाची नाती निर्माण होणं आणि परिवारात सामील होणं हा निव्वळ योगायोग नसून हा एक योग आणि भाग्यच आहे. आम्हाला आनंद देणारी मोठी मुलगी आमच्या परिवारात आली. आमचे आशिर्वाद कायम तुझ्याबरोबर असतील आणि प्रत्येक क्षणी आम्ही कायमच तुझी साथ सोबत देणार”, अशा प्रेमळ शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. कौमुदीने अश्विनीच्या या पोस्टवर कमेंट करित लिहिले की कदाचित माझा आई-बाबांबरोबरचा हा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर आहे आणि मला भारी वाटतंय की तो तुझ्यामुळे आहे.

हेही वाचा: Actor Dashan : “तो समाजासाठी घातक होता, म्हणून त्याची हत्या केली”; अभिनेता दर्शनची उच्च न्यायालयात धक्कादायक माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अश्विनी महांगडे व कौमुदी वालोकर यांनी यांनी आई कुठे काय करते या मालिकेत एकत्र काम केले आहे. अश्विनी अनघा या भूमिकेत दिसून आली तर कौमुदी आरोही या भूमिकेत दिसून आली. या मालिकेतसुद्धा त्यांचे एकमेकांबरोबरचे नाते प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळाले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. आता अभिनेत्री कौमुदी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तर, अश्विनी कोणत्या चित्रपट किंवा मालिकेतून भेटीला येणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.