अभिनेत्री अतिशा नाईक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय झाल्या. ‘घाडगे अँड सून’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘आभाळमाया’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाबरोबरच त्या बेधडक स्वभावासाठीही ओळखल्या जातात. नुकतीच त्यांनी ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनेलला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने वैयक्तिक, कौटुंबिक, करिअर अशा अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं.

हेही वाचा : …अन् भर रस्त्यात शाहिद कपूर पापाराझींवर भडकला, नेमकं काय घडलं?, व्हिडीओ व्हायरल

अतिशा नाईक वडिलांबरोबरच्या नात्याविषयी सांगताना म्हणाल्या, “बाबांचं निधन झाल्यावर मला प्रत्येक गोष्टीची किंमत कळाली. त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. त्यांच्यावर मी पूर्णपणे अवलंबून होते. त्यांना माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट माहित होती. बाबांचा आधार गेल्यावर पदोपदी मला ठेच लागली…ते गेल्यावर सगळ्यात मोठं नुकसान झालं. त्यांच्या जाण्याने मला आयुष्याकडे बघण्याची एक वेगळी ताकद मिळाली. आता मी कोणत्याही गोष्टीला सहज सामोरी जाऊ शकते.”

हेही वाचा : “मी आलियाबरोबर कधीही काम करु शकणार नाही, कारण…”; अनुराग कश्यपच्या विधान चर्चेत

वडिलांबद्दलची खास आठवण सांगताना अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “वडिलांबरोबरची प्रत्येक आठवण गोड आहे…एकही कटू आठवण नाहीये. मला मासिक पाळी आल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या वडिलांना सांगितलं होतं. यापेक्षा गोड आठवण काय असू शकते? मासिक पाळी आल्यावर मी खूप घाबरले होते… मला काय करू कळत नव्हतं. या गोष्टीला पिरेड्स म्हणतात की, मासिक पाळी हे सुद्धा मला माहिती नव्हतं.”

हेही वाचा : Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने अपूर्वा नेमळेकरचं एका शब्दात केलं वर्णन; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जेव्हा मी बाबांना ही गोष्ट सांगितली, त्यावेळी त्यांनी मला छान समजावलं आणि सगळ्या गोष्टी सविस्तरपणे आई तुला नीट सांगेल असं ते मला म्हणाले होते. एवढा मोकळेपणा आणि विश्वास प्रत्येक नात्यामध्ये पाहिजे असं मला वाटतं. मित्र-मैत्रिणी असो किंवा आई-वडिल आयुष्यात प्रत्येक नातं घट्ट पाहिजे.” असं अतिशा नाईक यांनी सांगितलं.