‘शार्क टॅंक इंडिया’चा पहिलं पर्व खूप गाजलं. त्यानंतर आता नुकतंच या कार्यक्रमाचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसरं पर्वही प्रचंड गाजत आहे. या कार्यक्रमात नवीन व्यवसायिक त्यांच्या बिझनेसच्या कल्पना घेऊन जज शार्क्सना सांगतात आणि शार्क्सना जर त्यांच्या व्यवसायात रस वाटलं तर ते त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवतात. परंतु नवीन व्यवसायिकांना त्यांचा बिझनेस उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये देणारे शार्क्स स्वतः मोठ्या तोट्यातून जात आहेत असा धक्कादायक खुलासा एका प्रसिद्ध लेखकाने केला आहे.

या पर्वात पियुष बन्सल, विनिता सिंग, नमिता थापर, अनुपम मित्तल आणि अमन गुप्ता हे शार्क्सच्या खुर्चीत बसलेले आहेत. एकीकडे हे सर्वजण प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहेत. पण दुसरीकडे जसजसा हा कार्यक्रम पुढे जातोय तसतशी या परीक्षकांवर टीका केली जात आहे. अ‍ॅमेझॉनवर लोकप्रिय लेखकांच्या सामील असलेल्या अंकित उत्तम याने या सगळ्या शार्क्सना कोट्यवधींचा फटका बसला असल्याचं त्याच्या एका पोस्टमध्ये म्हटलं.

आणखी वाचा : Shark Tank India 2: प्रसिद्ध लेखकाकडून नमिता थापरची अनन्या पांडेशी तुलना, म्हणाला, “तिचे वडील…”

अंकित उत्तम याने लिंक्डइन या साइटवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने लिहिलं, “विनिता सिंग हिच्या ‘शुगर कॉस्मेटिक्स’ या कंपनीचं गेल्या वर्षी ७५ कोटींचं नुकसान झालं. पियुष बन्सल याच्या ‘लेन्सकार्ट’ या कंपनीला गेल्या वर्षी १०२.३ कोटींचा फटका बसला. अनुपम मित्तल हा शादी डॉट कॉम, मकान डॉट कॉम, मौज मोबाईल या कंपन्यांचा मालक आहे. पण त्याची शादी डॉट कॉमव्यतिरिक्त कोणतीही दुसरी कंपनी चालत नाहीये. गेल्या वर्षी शार्कच्या खुर्चीत बसलेल्या अमित जैन यांच्या ‘कार देखो’ या कंपनीला गेल्या वर्षी २४६.५ कोटींचा तोटा झाला.”

हेही वाचा : Shark Tank India 2: कार्यक्रमादरम्यान मोठा वाद, अनुपम मित्तलशी झालेल्या भांडणामुळे नमिता थापरने सोडला मंच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “एमक्यूअर फार्मा ही कंपनी नमिता थापरने नाही तर तिच्या वडिलांनी सुरु केली आणि आजही तेच या कंपनीचे सीईओ आहेत. त्यामुळे या कंपनीत तिचा सहभाग हा बॉलिवूडमधील अनन्या पांडेच्या सहभागाइतकाच आहे. फक्त अमन गुप्ता याची बोट ही कंपनीच सुरुवातीपासून नफ्यात आहे.” अंकितची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आता यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत त्यांची मत मांडत आहेत.