अविनाश नारकर हे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं ते विविध मालिका, नाटकं, चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या कामाबरोबर असते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. विशेष करून त्यांच्या पोस्ट आणि हटके डान्स रील्स कायम लक्ष वेधून घेत असतात. आता त्यांचं असंच एक रील चर्चेत आलं आहे.

अविनाश नारकर गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या गावी भुईबावडा येथे आले होते. या त्यांच्या नव्या रीलमध्ये ते गावाच्या निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे खळखळ वाहणारी नदी, हिरवीगार झाडं, डोंगर दिसत आहेत. हा स्वर्ग पाहण्यासाठी गावी यायलाच पाहिजे असं त्यांनी या रीलमध्ये सांगितलं. पण याचबरोबर त्यांनी सध्याच्या एक ट्रेंडिंग गाणं म्हणत ताल धरला. हे गाणं म्हणजे ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला.’

आणखी वाचा : Video: ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांचं जशास तसं उत्तर, नवीन रील पोस्ट करत म्हणाल्या…

गेले काही दिवस आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत यावर अनेक लहान मुलांनी व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर टाकले आहेत. तर मोठ्या मंडळींनाही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता येत नाहीये आणि त्यापैकीच एक म्हणजे अविनाश नारकर. हे गाणं म्हणताना त्यांनी अगदी साईराज केंद्रे सारखे हावभाव करत हे गाणं म्हटलं.

हेही वाचा : Video: “आमची मतं वेगळी…”, ऐश्वर्या नारकरांनी व्यक्त केल्या पती अविनाश नारकरांबद्दलच्या भावना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अविनाश नारकर यांच्या या नवीन व्हिडीओने आता सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. तर आता त्यावर कमेंट करत नेटकरी त्यांचं हे गाव, निसर्ग आवडल्याचं सांगत आहेत.