छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘भाभीजी घर पर है’. या मालिकेमध्ये अंगुरी भाभी हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं. हे पात्र मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रेने साकारलं. सध्या शुभांगी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पती पियुष पुरे व शुभांगी यांचा घटस्फोट झाला आहे. शुभांगीच्या घटस्फोटाचं वृत्त ऐकताच चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आणखी वाचा – सतीश कौशिक यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? मध्यरात्रीच रुग्णालयामध्ये जात होते पण…

शुभांगीनेच तिच्या घटस्फोटाबाबत माहिती दिली आहे. ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शुभांगी म्हणाली, “गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं एकत्र राहत नाही. पियुष आणि मी आमचं लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केलं. सन्मान, विश्वास आणि मैत्रीवरच लग्नाचं नातं टिकून असतं. पण आमच्या मतभेदांमधून कोणताच मार्ग निघत नव्हता”.

“म्हणूनच आम्ही दोघांनी एकमेकांना अंतर देणं, वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देणं, करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. कुटुंबाला पहिलं प्राधान्य मी देते. आपल्या कुटुंबातील सदस्य आजूबाजूला असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. खूप वर्षांचं नातं जेव्हा तुटतं तेव्हा मानसिक व भावनिक त्रास होतो. पण आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि मीही या निर्णयाशी सहमत आहे”.

आणखी वाचा – Video : १० वर्षांच्या लेकीसह सतीश कौशिक यांचा भन्नाट डान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००३मध्ये इंदौर येथे शुभांगी व पियुष यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या १९ वर्षांनंतर दोघंही एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. शुभांगीला १८ वर्षांची मुलगी आहे. आठवड्याच्या प्रत्येक रविवारी पियुष मुलीला भेटायला येत असल्याचंही शुभांगीने सांगितलं. मुलीला वडिलांचंही प्रेम मिळालं पाहिजे असं शुभांगीला वाटतं.