‘बिग बॉस’ मराठीचं चौथ्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली. शोच्या पहिल्याच आठवड्यामध्ये एकमेकांशी प्रेमाने बोलणाऱ्यांना स्पर्धकांनी आता दुसऱ्या आठवड्यामध्ये बराच राडा केला आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये टास्क करतानाही स्पर्धकांमध्ये बराच राडा व भांडण झालं. आता या आठवड्याच्या चावडीवर सुत्रसंचालक महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेणार आहेत. कलर्स मराठी वाहिनीने आता याचा नवा प्रोमो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4 : “अरे ए किरण माने तुला…” अपूर्वा नेमळेकरची दादागिरी सुरुच, राग अनावर झाला अन्…

एलिमिनेशन तसेच कॅप्टन्सीच्या टास्कसाठी या आठवड्यामध्ये स्पर्धकांमध्ये जबरदस्त भांडण झालं. त्यांचं भांडण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलं. सामान्य माणूस म्हणून अक्षरशः स्पर्धकांनी घरामध्ये धुमाकूळ घातला. किरण माने यांची विमानतळ या टास्कदरम्यान जीभ घसरली. “थोडी तरी लाज बाळगा. कॅमेरा सगळं बघत आहे.” असं ते म्हणाले होते.

पाहा व्हिडीओ

तसेच अपूर्वा नेमळेकरला महेश मांजरेकर यांनी पहिल्या आठवड्यामध्ये समजवूनही तिची दादागिरी सुरुच राहिली. विकास सावंत, मेघा घाडगे यांच्या भांडणामध्ये किरण माने बोलत असताना तिनेही मध्येच बोलायला सुरुवात केली. यावेळी किरण माने-अपूर्वा नेमळेकरमध्ये वादाची ठिणगी पडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – ‘बिग बॉस ४’ मराठीच्या स्पर्धकांवर भडकल्या अभिनेत्री सुरेखा कुडची, म्हणाल्या, “ज्येष्ठ कलाकाराला अरे तुरे…”

अपूर्वाने चक्क अरेतुरेची भाषा वापरली. “अरे ए किरण माने तो त्याचं (विकास सावंत) बोलेल ना तुला काय करायचं आहे?” असं अपूर्वा म्हणाली. अपूर्वाचं हे वागणं प्रेक्षकांनाही पटलं नाही. ती उद्धट असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं. आता या सगळ्या प्रकरणावर महेश मांजरेकर बोलताना दिसणार आहेत.