अब्दू रोजिक हा ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वातील सर्वाधिक लोकप्रिय चेहरा होता. प्रेक्षकांकडूनही त्याला भरपूर प्रेम मिळत होतं. परंतु, वैयक्तिक कामासाठी अब्दूने ‘बिग बॉस हिंदी’ला रामराम ठोकला होता. अब्दूने ‘बिग बॉस’च्या घरातून अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे चाहत्यांबरोबरच घरातील सदस्यांनाही आश्चर्याचा धक्का मिळाला होता.

‘बिग बॉस’च्या घराचा अब्दूने निरोप घेतल्यानंतर त्याला परत आणण्याची मागणी चाहत्यांकडून होत होती. प्रेक्षकांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे.अब्दूने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वीकेंड का वारमध्ये त्याची झलक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांबरोबर घरातील सदस्यही अब्दूच्या घरवापसीने आनंद होणार आहे.

हेही वाचा>> “अरुंधतीला गाताना पाहून…”, प्रसिद्ध गायकाने ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीसाठी केली खास पोस्ट

हेही वाचा>>“…म्हणून मी त्यांना चित्रपटात घेतो”, रोहित शेट्टीचं मराठी कलाकारांबाबत मोठं वक्तव्य

अब्दू ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा प्रवेश करणार असला तरी यामध्ये एक ट्वीस्ट असणार आहे. अब्दू काही दिवसांकरिताच बिग बॉसच्या घरात असणार आहे. कामामुळे त्याला जानेवारी महिन्यात हा शो सोडावा लागणार आहे. परंतु, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील कलाकराची ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत एन्ट्री; पोस्ट शेअर करत अभिनेता म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस हिंदी’चा या आठवड्याचा वीकेंड का वार खास असणार आहे. अभिनेता रितेश देशमुख व जिनिलिया त्यांच्या वेड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस’मध्ये हजेरी लावणार आहेत. यंदाचा वीकेंड का वार सलमान खानसह मनीष पॉलही होस्ट करताना दिसणार आहे.