scorecardresearch

Video : जोरदार भांडण अन् नंतर पॅनिक अटॅक, निमृत कौरच्या आजाराची शालीन भानोतने उडवली खिल्ली, पुढे काय घडलं पाहा?

‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये आणखी एका सदस्याला पॅनिक अटॅकचा सामना करावा लागला आहे.

Video : जोरदार भांडण अन् नंतर पॅनिक अटॅक, निमृत कौरच्या आजाराची शालीन भानोतने उडवली खिल्ली, पुढे काय घडलं पाहा?
'बिग बॉस १६'च्या घरामध्ये आणखी एका सदस्याला पॅनिक अटॅकचा सामना करावा लागला आहे.

‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये काही दिवसांपूर्वीच सुबूंल तौकीर खानला पॅनिक अटॅक आला. टीना दत्ता व शालीना भानोतबरोबर झालेलं भांडण सुंबूलला सहन झालं नाही. दरम्यान काही वेळानंतर सुंबूल ठिक झाली. आता घराती आणखी एका सदस्याला पॅनिक अटॅक आला असल्याचं समोर आलं आहे. निमृत कौर अहलुवालियाला घरात पॅनिक अटॅक आला. पण दरम्यान घरातील काही सदस्यांनी तिची थट्टा केली.

आणखी वाचा – Video : घट्ट मिठी मारली, किस केलं अन्…; शालीन भानोत व टीना दत्ताचा ‘बिग बॉस’च्या घरात खुलेआम रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

कलर्स टीव्ही वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निमृत व शालीनमध्ये जोरदार भांडण झालं असल्याचं दिसत आहे. प्राइज मनीमधील २५ लाख रुपये परत मिळवण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये एक टास्क होणार आहे.

या टास्करदरम्यानेच निमृत व शालीनमध्ये जोरदार भांडण होतं. शिवाय कॅप्टन्सीसाठी निमृत सुंबूल तौकीर खानला पाठिंबा देते. ते पाहून शालीनला राग अनावर होतो. तो निमृतला उलट-सुलट बोलू लागतो. भांडणामध्येच शालीन निमृतच्या मानसिक आजाराची थट्टा करतो.

आणखी वाचा – Video : तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडताच चक्क जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागले किरण माने, प्रेक्षकही भडकले

दरम्यान शालीनच्या या बोलण्यामुळे निमृतला राग अनावर होतो व तिला पॅनिक अटॅक येतो. याआधीही निमृतने आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याबाबत ‘बिग बॉस’ला सांगितलं होतं. निमृतला नैराश्येचाही सामना करावा लागत आहे. अशामध्येच शालीन तिची थट्टा करत असल्याचं पाहून प्रेक्षकही त्याच्यावर संतापले आहेत. आता विकेण्डच्या वारमध्ये सलमान कोणतं पाऊल उचलणार हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 12:26 IST

संबंधित बातम्या