छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त तरीही तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. हिंदी बिग बॉसचं १६वं पर्व चांगलंच गाजत आहे. यंदाच्या पर्वात रोज काहीतरी नवं घडलेलं पाहायला मिळत आहे. घरातील सदस्यांमध्येही छोट्या छोट्या कारणांवरुन खटके उडत आहेत. आता अर्चना गौतम व शिव ठाकरेच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे.

‘कलर्स वाहिनी’च्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अर्चना गौतम व शिव ठाकरेमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे. सौंदर्या शर्मा किचनमध्ये चपाती बनवत असते. तेवढ्यात अर्चना तिथे येऊन “माझं कणीक कुठे आहे?” असं विचारते. यावर सौंदर्या तिला “मिक्स झालं आहे. त्या कणीकच्या चपात्या इतर लोकांच्या जेवणाच्या ताटात आहेत. आता त्यांच्याकडून तर मागून घेऊ शकत नाही”, असं म्हणते.

हेही वाचा>> “माझ्या कॅन्सरग्रस्त आईसाठी…” बिग बॉसच्या घरात राखी सावंत भावूक

हेही पाहा>> Photos: पुण्याच्या Golden Guysचा नादखुळा! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी अन्…; ‘गोल्डन कार’ कलेक्शन पाहिलंत का?

अर्चना यावर सौंदर्याला रात्रीच्या कणीकच्या चपात्या खाणार नाही असं म्हणते. ज्यांच्यासाठी जे कणीक होतं त्यांनी त्याच कणीकच्या चपात्या खाव्यात असंही पुढे म्हणते. यावर सौंदर्या शेवटी कॅप्टन निमृत कौरला इतर सदस्यांच्या ताटातील चपात्या काढून आण, असं म्हणते. निमृत मग अब्दू व शिवच्या ताटातील चार चपात्या काढून आणते.

हेही वाचा>> “फक्त काहीच लोकांना दाखवण्याचा…” घरातून बाहेर पडलेल्या समृद्धी जाधवचे ‘बिग बॉस’वर गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्चनाच्या या विचित्र वागण्याचा शिवला राग येतो. त्यानंतर अर्चना व शिवमध्ये वाद निर्माण होतो. “जेवणाच्या ताटातून चपाती काढून घेऊन जात आहेत. थोडीतरी लाज बाळग. एक दिवस कर्मा तुला नक्कीच समज देईल”, असं शिव अर्चनाला म्हणतो.  शिव व अर्चनामधील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.