‘बिग बॉस १६’च्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरेची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसली. शिव या ट्रॉफीपासून दूर राहिला. पण त्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं. छोट्या पडद्यावर नावाजलेल्या रिएलिटी शोमध्ये सहभागी होणारा शिव अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. मुळचा अमरावतीमधला शिव आज कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे.
शिवचं अमरावतीमध्ये स्वतःचं घर आहे. त्याचं हे घर नेमकं कसं आहे? हे एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. युट्यूबवर रश्मी ही शिवच्या अमरावती येथील घरी पोहोचली होती. तिने यावेळी शिवच्या घराचा व्हिडीओ शूट केला. तसेच तिने शिवच्या आईचीही भेट घेतली. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
शिवचं घर अगदी साधं पण सुंदर आहे. घराच्या हॉलमध्येच गणपतीची मोठी मुर्ती आहे. तसेच त्याच्या घराच्या भिंतीवर ‘बिग बॉस’ विनर असा लिहिलेला कागद लावला असल्याचं दिसत आहे. इतकंच नव्हे तर हॉलमध्ये शिवच्या विविध ट्रॉफीही दिसत आहेत. छोटं पण सुंदर असं शिवचं घर आहे.
मध्यंतरी शिवच्या आईने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, शिव मुंबईमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहतो. आता शिवला मुंबईमध्ये त्याचं स्वतःचं घर घ्यायचं आहे. शहरात आलिशान घर असावं अशी शिवची इच्छा आहे. आता तो उत्तम लाइफस्टाइलसाठी अधिकाधिक मेहनत घेताना दिसेल एवढं नक्की.