‘बिग बॉस १६’च्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरेची सर्वाधिक चर्चा रंगत आहे. शिवने उत्तम खेळत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. छोट्या पडद्यावर नावाजलेल्या रिएलिटी शोमध्ये सहभागी होणारा शिव अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. मुळचा अमरावतीमधला शिव त्याच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिला. आता त्याच्या आईने एक खुलासा केला आहे.
आणखी वाचा – “त्याच मुलीबरोबर तो…” शिव ठाकरेच्या लग्नाबाबत आईचा खुलासा, लेकाच्या रिलेशनशिपबाबतही केलं भाष्य
‘टेली खजाना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवच्याा आईने त्याच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं. शिवाय त्याची जीवनशैली कशी आहे? शिव स्वभावाने कसा आहे? या सगळ्या गोष्टी शिवच्या आईने मुलाखतीमध्ये उघड केल्या. तसेच शिवच्या घराबाबतही त्याच्या आईने या मुलाखतीमध्ये सांगितलं.
भाड्याच्या घरात राहतो शिव
शिवच्या आईला त्याच्या डान्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, “शिव डान्स चांगला करतो. २०० ते ३०० मुलांना तो अमरावतीमध्ये डान्स शिकवतो. त्याची जी मॅनेजर आहे तीही शिवबरोबर डान्स क्लास घेते. शिवची मॅनेजर मुलांच्या डान्सचा सराव घेते. त्या मधल्या दिवसांमध्ये शिव मुंबईमध्ये कामानिमित्त येतो.”
आणखी वाचा – “त्याला बोलताही येत नाही” निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या आजाराबाबत दिली माहिती
“मुंबईमधलं काम पाच ते सहा दिवसांमध्ये तो उरकतो. तसेच पुन्हा अमरावतीमध्ये येतो. म्हणूनच त्याने फ्लॅट घेतला आहे. पण हा फ्लॅट भाड्यवर आहे. आमचं स्वतःचं ते घर नाही.” शिवने छोट्या पडद्यावरील रिएलिटी शोमध्ये सहभाग घेत कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अजूनही तो अधिकाधिक मेहनत करताना दिसतो.