‘बिग बॉस १६’मध्ये मराठमोळा शिव ठाकरेने प्रवेश केला. ‘बिग बॉस’च्या घरात उत्तमोत्तम खेळत शिवने सगळ्यांचं मन जिंकलं आहे. त्याच्यावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. छोट्या पडद्यावर नावाजलेल्या रिएलिटी शोमध्ये सहभागी होणारा शिव त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये त्याने अभिनेत्री वीणा जगतापला प्रपोज केलं.

आणखी वाचा – “तो आतापर्यंत…” वीणा जगतापबरोबर असलेल्या नात्याबाबत शिव ठाकरेची आई स्पष्टच बोलली

वीणा व शिवच्या रिलेशनशिपचा आता दि एण्ड झाला आहे. शिव आता कोणाला डेट करत आहे का? त्याचं लग्न नक्की कोणाबरोबर होणार? अशा कित्येक चर्चाही रंगल्या. आता त्याच्या आईनेच शिवच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. शिवसाठी मुलींच्या रांगा लागतात असं त्याच्या आईचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

शिव ठाकरेच्या लग्नाबाबत आईचा खुलासा

‘टेली खजाना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवच्याा आईला त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शिवची आई म्हणाली, “आता तरी त्याचं कोणतंच रिलेशनशिप नाही. सगळं बंद आहे. मी स्वतः आधी करिअरवर लक्ष केंद्रित करणार. त्यानंतर मी लग्नाचा विचार करेन असं शिव म्हणतो.”

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अमरावतीमधील मुलगीच मी त्याच्यासाठी शोधणार आहे. मला तसेच शिवच्या वडिलांनाही मुलीने सांभाळलं नाही तरी चालेल. पण पती-पत्नीचं पटलं पाहिजे अशी मुलगी मी त्याच्यासाठी शोधणार आहे. समजूतदार मुलगी मी शोधणार. बाकी कोणत्याच मुलीबरोबर तो लग्न नाही करणार. अमरावतीमध्ये तर शिवसाठी मुलींच्या रांगा लागतात.” तसेच शिवच्या आईला बऱ्याच मुली येऊन भेटतात. आम्हाला शिवशी लग्न करायचं आहे असं म्हणतात. असंही शिवच्या आईने यावेळी सांगितलं.