प्रियांका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता टीव्हीवरील लोकप्रिय कपल आहे. ‘उडारिया’ मालिकेमध्ये ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. त्यानंतर प्रियांका आणि अंकित ‘बिग बॉस १६’मध्ये एकत्र सहभागी झाले होते. बिग बॉसमधील त्यांच्या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले होते. आता लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, नुकतेच प्रियांकाने या चर्चांवर मौन सोडले आहे.

प्रियांका व अंकित सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. अनेकदा दोघे एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात. आता लवकरच ते लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये दोघे लग्नगाठ बांधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, आता खुद्द अंकिताने याबाबतचा खुलासा केला आहे.

Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले, “सध्या मार्च सुरू आहे. पण असं दिसतंय की, काही मीडिया पोर्टल्सचे ‘एप्रिल फूल’ लवकरच होणार आहे.” प्रियांकाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. या पोस्टनंतर प्रियांका व अंकित लग्न करणार नसल्याचे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा- पाच वर्षांचं अफेअर, लिव्ह इन अन्…; आता पुलकित सम्राट-क्रिती खरबंदा करणार लग्न, ‘असा’ असेल सोहळा

प्रियांका व अंकितची पहिली भेट ‘उडारिया’ मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेमुळे दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. याअगोदरही अनेकदा दोघांच्या लग्नाबाबत अफवा ऐकायला मिळाल्या होत्या. परंतु, प्रत्येक वेळी दोघांनी आम्ही चांगले मित्र आहोत, असे उत्तर दिले होते.