‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रॅपर एमसी स्टॅन यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. ‘बिग बॉस हिंदी’च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये शालिन भानोत एक होता. परंतु, त्याला पाचव्या स्थानावरच समाधान मानावं लागलं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच शालिनला त्याच्या पहिल्या पत्नीच्या लग्नाची बातमी मिळाली आहे.

शालिन भनौतची पत्नी व अभिनेत्री दलजित कौर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. दलजित मार्च महिन्यात निखिल पटेलशी लग्नगाठ बांधणार आहे. नुकतंच तिचा साखरपुडा पार पडला. दलजित लग्न करणार असल्याची माहिती शालिनला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर मिळाली. पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाबाबत शालिनला एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्याने मला याबद्दल काहीच माहित नाही, असं सांगितलं.

हेही वाचा>> Video: राखीला जवळ घेतलं, किस केलं अन्…; अभिनेत्रीने शेअर केला आदिलबरोबरचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

हेही पाहा>>रिसेप्शन सोहळ्यातील कियारा अडवाणीच्या नेकलेसची चर्चा, नेटकरी म्हणाले “कुंकू आणि मंगळसूत्र…”

शालिन म्हणाला, “सलमान खान सरांनी एका वीकेंएडला याबाबत भाष्य केलं होतं. पण दलजितच्या लग्नाबाबत मला काहीही माहिती नाही. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर मला याची माहिती मिळाली. दलजित कौर आणि निखिल दोघेही आनंदी राहो, अशी मी देवाकडे प्रार्थना करेन”.

हेही वाचा>> सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन सोहळ्याला कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांची हजेरी, फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शालिन व दलजित पहिल्यांदा २००६ मध्ये एकमेकांना भेटले होते. ‘कुलवधू’ मालिकेत त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी २००९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर लग्नाच्या सहा वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. दलजितने शालिनवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यांना जेडन हा मुलगा आहे.