‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला शिव ठाकरे हिंदीमध्येही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. ‘बिग बॉस हिंदी’च्या येणाऱ्या भागात फॅमिली वीक सेलिब्रेट करण्यात येणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कुटुंबियांपासून दूर असलेल्या सदस्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरातील खास पाहुणे येणार आहेत.

‘बिग बॉस १६’ मधील चर्चेतील चेहऱ्यांपैकी साजिद खान एक आहे. साजिदला भेटायला त्याची बहीण फराह खान येणार आहे. कलर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. फराहने घरात प्रवेश करताच साजिदला घट्ट मिठी मारली. फराहला पाहून साजिद भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. फराह खानलाही अश्रू अनावर झाले. “आईला तुझ्यावर गर्व आहे. तू खूप भाग्यवान आहेस. तुला घरात मंडली मिळाली आहे”, असं फराह साजिदला म्हणाली.

हेही वाचा>>‘बिग बॉस’ची ट्रॉफी हुकल्यानंतर अमृता धोंगडेची पोस्ट, म्हणाली “आता प्रत्यक्षात…”

हेही पाहा>>Photos: ‘तू तेव्हा तशी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, साखरपुड्याचे फोटो व्हायरल

साजिद खानची ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरे, अब्दू रोझिक व एमसी स्टॅनशी घट्ट मैत्री झाली आहे. फराहने या तिघांचीही प्रशंसा केली. “माझा एक भाऊ घरात होता. पण जाताना मी आणखी तीन भाऊ घेऊन जात आहे”, असं फराह खान म्हणाली. शिव ठाकरेलाही मिठी मारत ती म्हणाली, “तू माझा भाऊ आहेस”. एमसी स्टॅन व अब्दू रोझिकचंही फराहने कौतुक केलं.

हेही वाचा>>“राखी सावतंमुळे ‘बिग बॉस’ला टीआरपी मिळतो, पण…”, आरोह वेलणकर स्पष्टच बोलला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस हिंदी’च्या गेल्या आठवड्यातील नॉमिनेशन रद्द करण्यात आलं. त्यामुळे गेल्या आठवड्यात कोणताही सदस्य घराबाहेर पडला नाही. आता घरातील सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटायला येणार असल्यामुळे हा आठवडा खास असणार आहे.