scorecardresearch

सुंबूल तौकीर ऑन स्क्रीन पती फहमान खानसह बांधणार लग्नगाठ? ‘बिग बॉस’मध्ये खुलासा करत म्हणाली…

Bigg Boss 16: फहमान खानशी लग्न करण्याबाबत सुंबूलने केला खुलासा

सुंबूल तौकीर ऑन स्क्रीन पती फहमान खानसह बांधणार लग्नगाठ? ‘बिग बॉस’मध्ये खुलासा करत म्हणाली…
सुंबूलने फहमान खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स डेस्क)

‘बिग बॉस हिंदी’चं १६वं पर्व गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ‘इमली’ फेम अभिनेत्री सुंबूल तौकीर या पर्वात अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सुंबूलचा मित्र असलेल्या अभिनेता फहमान खाननेही ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली होती. परंतु, एका आठवड्यातच त्याचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपला.

फहमानला ‘बिग बॉस’च्या घरातून निरोप देताना सुंबूल भावूक झाली होती. सुंबूल व फहमान हे चांगले मित्र आहेत. त्यांची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती. ‘इमली’ मालिकेत फहमान व सुंबूल पती-पत्नीच्या भूमिकेत दिसले होते. ऑन स्क्रिनप्रमाणेच ऑफ स्क्रिनही त्या दोघांची केमिस्ट्री चांगली आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. आता खुद्द सुंबूलनेच याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा>> “मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला पण…” मानसी नाईकचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

‘बिग बॉस’च्या घरात सुंबूलने फहमान खानसह लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निमृत कौर अहुवालिया व साजिद खानशी लग्नाबाबत बोलताना सुंबूलने जाहीरपणे फहमान खानबरोबर लग्न करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली, “जर फहमानला ४०व्या वर्षापर्यंत कोणी साथीदार भेटली नाही किंवा त्याने लग्न केलं नाही तर मी त्याच्याशी लग्न करेन”. सुंबूल फहमानपेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. याबाबत निमृत व साजिद बोलताना दिसून आले.  

हेही वाचा>> “ते त्यांचं वैयक्तिक…” लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’बाबत केलेल्या वक्तव्यावर IFFI च्या ज्युरींची स्पष्ट भूमिका

सुंबूल व फहमानमधील केमिस्ट्री चाहत्यांनाही आवडते. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताना सुंबूलने फहमानच्या डोक्यावर केलेल्या किसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिने फहमानला तिचं ब्रेसलेटही दिलं होतं. या गोष्टींमुळे त्यांच्यात मैत्रीपलिकडे काही आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 12:33 IST

संबंधित बातम्या