scorecardresearch

Bigg Boss 16 : शिव ठाकरे पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणार?, नॉमिनेटेड स्पर्धकांची लिस्ट पाहा

‘बिग बॉस’ने दिलेल्या टास्कमध्ये घरातील सहा सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे.

Bigg Boss 16 : शिव ठाकरे पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणार?, नॉमिनेटेड स्पर्धकांची लिस्ट पाहा
‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरेला नॉमिनेट करण्यात आलं आहे.

‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाला १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. इतर पर्वांप्रमाणेच या पर्वालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दुसऱ्याच दिवशी ‘बिग बॉस’ने  नॉमिनेशनचा टास्कने घरातील सदस्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वात शिव ठाकरेही सहभागी झाला आहे. ‘बिग बॉस’ने दिलेल्या टास्कमध्ये घरातील सहा सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. साजिद खान, गौतम सिंग विग, एमसी स्टॅन, गोरी नगोरी, अर्चना प्रधान यांच्यासह शिव ठाकरेही नॉमिनेट झाला आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची टांगती तलवार शिव ठाकरेवर आहे. वोट करण्यासाठी शिवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना आवाहनही केलं आहे.  

हेही वाचा >> Video : ऋषभ पंतच्या वाढदिवशी उर्वशीने शेअर केला व्हिडीओ, ‘फ्लाइंग किस’ देत म्हणाली…

हेही पाहा >> Photos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का?

शिवच्या या पोस्टवर चाहत्यांना कमेंटही केल्या आहेत. “आपल्या माणसाला वोट करा”, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर दुसऱ्याने “मराठी सीझन २ची पुनरावृत्ती करु. आपला माणूस शिवला विजयी करू”, असं म्हटलं आहे. शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेता होता. ‘बिग बॉस’च्या घरातील अभिनेत्री वीणा जगताप आणि शिव यांची जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती. परंतु, नंतर काही कारणांमुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले. ‘एमटीव्ही रोडीज’ या रिएलिटी शोमधून शिवला प्रसिद्धी मिळाली होती.

हेही वाचा >> ‘मिर्झापूर’मधील ‘कालिन भैय्या’ दिसणार नव्या भूमिकेत; पंकज त्रिपाठीला निवडणूक आयोगाने ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून केले घोषित

‘बिग बॉस हिंदी’च्या घरात शिवला पाहण्यासाठी त्याचे चाहतेही आतुर होते. परंतु, आता पहिल्याच आठवड्यात त्याला नॉमिनेट करण्यात आलं आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी’च्या घरातून बाहेर पडणार का?, हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या