‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस हिंदी’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. एमसी स्टॅन त्याच्या गाण्याबरोबरच हटके स्टाइलसाठीही ओळखला जातो. स्टॅनच्या गळ्यातील चेनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चेनप्रमाणेच स्टॅनचा ‘शेंबडी’ हा शब्दही व्हायरल झाला होता.

‘बिग बॉस’च्या घरात एमसी स्टॅनचे अनेक सदस्यांशी खटके उडायचे. अर्चना गौतम व एमसी स्टॅनमध्ये वारंवार वाद झालेले पाहायला मिळायचे. स्टॅन अर्चनाला शेंबडी म्हणून हाक मारायचा. बिग बॉसच्या घरातील त्याचे अर्चनाला शेंबडी म्हणताच्या व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरलही झाल्या होत्या. अखेर एमसी स्टॅनने अर्चनाला शेंबडी म्हणण्यामागच्या उलगडा केला आहे. अर्चनाला शेंबडी म्हणण्यामागचं खरं कारण स्टॅनने सांगितलं आहे.

हेही वाचा>> Bigg Boss 16:’बिग बॉस’चा विनर ठरलेल्या एमसी स्टॅनसाठी उर्फी जावेदचं ट्वीट, हार्ट इमोजी पोस्ट करत म्हणाली…

हेही वाचा>> सुकेश चंद्रशेखरकडून नोरा फतेहीचा ‘गोल्ड डिगर’ असा उल्लेख, म्हणाला…

एमसी स्टॅन म्हणाला, “बिग बॉसच्या घरात आम्ही चार महिने होतो. ते चारही महिने अर्चनाला सर्दी होती. म्हणून मी तिला शेंबडी म्हणायचो. माझ्या बालपणी हा शब्द आम्ही वापरायचो. माझ्या मित्रमैत्रीणींना मी कधीकधी याच नावाने हाक मारायचो. त्यामुळेच ‘बिग बॉस’च्या घरात माझ्या तोंडून शेंबडी हा शब्द निघाला. पण तो व्हायरल का झाला, हे मला ठाऊक नाही”.स्टॅनने घरातून बाहेर पडल्यानंतर अर्चनाला भेटण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. तिचं तोंडही पाहणार नसल्याचं स्टॅन म्हणाला आहे.

हेही वाचा>> पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाबाबत समजताच शालिन भानोत आश्चर्यचकित, म्हणाला “दलजित कौर आणि…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमसी स्टॅन ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी मिळाली. त्याबरोबरच त्याला ३१ लाख ८० हजार रुपये रक्कम देण्यात आली. एमसी स्टॅनला Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून दिली गेली.