‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचं विजेतेपद रॅपर एमसी स्टॅनने पटकावलं. पुण्याचा रॅपर अशी ओळख असलेल्या एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. सध्या तो त्याच्या कामासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये एमसी त्याची गर्लफ्रेंड बूबाबाबत बऱ्याचदा बोलताना दिसला. आता तर त्याने त्याच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : ….अन् प्रभाकर मोरेंसह ‘शालू’ गाण्यावर परदेशी मुलांनाही धरला ठेका, समीर चौघुले म्हणाले, “आमचा प्रभा…”

‘बिग बॉस’च्या रात असताना एमसी स्टॅनने अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख ‘बूबा’ असा केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने गर्लफ्रेंडचं नाव घेत त्याच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. तसेच बूबा आणि तो किती वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत हेही सांगितलं आहे.

आणखी वाचा – आठ वर्षांचा संसार, पहिल्या पत्नीशी घटस्फोट, एक मुलगी अन्…; नवीन ‘तारक मेहता’ने थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो व्हायरल

एमसी स्टॅन म्हणाला, “या एक ते दीड वर्षामध्ये मला बूबाबरोबर लग्न करायचं आहे. चार ते पाच वर्षांपासून आमचं रिलेशनशिप सुरू आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. कारण ती अगदी गोड मुलगी आहे. मुलगी कशी दिसते हे मी बघत नाही. फक्त ती हुशार असली पाहिजे. मी लकी आहे की, ती माझ्या आयुष्यामध्ये आहे”.

आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला तिच्याबाबत जास्त काही बोलायचं नाही. कारण मला माझं लव्ह लाइफ खासगी ठेवायचं आहे. बूबामुळे मी बदललो आहे. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये मला तिची खूप आठवण येत होती. जेव्हा घरामध्ये कपल एकत्र बसायचे तेव्हा मी त्यांना माझ्यासमोर एकत्र बसू नका म्हणून सांगायचो.” एमसी गर्लफ्रेंडवर अगदी जीवापाड प्रेम करतो हे त्याच्या बोलण्यामधून दिसून आलं.