Bigg Boss 17 Update: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू झाला आहे. २८ जानेवारीला या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे, विक्की जैन, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार हे सहा सदस्य आहेत. या सहा सदस्यांमधून फक्त एक सदस्य ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी जिंकू शकणार आहे. त्यामुळे सध्या या सदस्यांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळत आहे. अशातच अंकिता लोखंडेने मराठीतून चाहत्यांना मतांसाठी आवाहन केलं आहे.

काही तासांपूर्वी अंकिता लोखंडेच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “आपल्या मराठी मुलीला तुमच्या मदतीची गरज आहे,” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, अंकिता मराठीतून चाहत्यांना मत करण्यासाठी आवाहन करत आहे. “‘बिग बॉस’ची ट्रॉफी घरी आणण्यासाठी मला तुमची साथ हवीये. त्यासाठी मला प्लीज मतं करा,” अशी विनंती अंकिताने या व्हिडीओतून चाहत्यांना केली आहे.

हेही वाचा – Video: “राम सिया राम…”, प्रसिद्ध गायकांच्या आवाजातील भजनांनी दुमदुमली अयोध्यानगरी, व्हिडीओ व्हायरल

अंकिताच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहीजण अंकिताच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत आहेत. तर काहीजण तिला विरोध करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Bigg Boss 17: आयशा खाननंतर इशा मालविया ‘बिग बॉस १७’मधून बेघर, ढसाढसा रडू लागला अभिषेक कुमार, म्हणाला…

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा तब्बल ६ तास असणार आहे. २८ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार हा सोहळा रात्री १२ पर्यंत असणार आहे. माहितीनुसार, महाअंतिम फेरीत अंकिता लोखंडेसह विक्की जैन, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नारा चोप्रा पोहोचले आहेत.