‘बिग बॉस’चा १७ वा सीझन सध्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी घरातील सदस्यांची दोन टीममध्ये विभागणी करण्यात आली होती. मनारा, मुनव्वर, अभिषेक, अरुण यांची एक टीम आणि दुसऱ्या टीममध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, इशा मालवीय आणि आएशा यांचा समावेश होता.

स्वत:ला नॉमिनेशपासून वाचवण्यासाठी स्पर्धकांना टॉर्चर टास्क खेळावा लागला. यामध्ये अंकिता, विकी, आएशा व इशाच्या टीमने मिळून मुनव्वर फारुकीसह त्याच्या टीममधील सदस्यांना मोठ्या प्रमाणात टॉर्चर केलं. स्पर्धकांच्या तोंडावर, डोळ्यात तिखट मसाले फेकण्यात आले होते. या टॉर्चर टास्कचा प्रोमो व्हायरल झाल्यावर अंकिता व टीमला सर्वत्र ट्रोल करण्यात आलं.

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’च्या यशानंतर उपेंद्र लिमये पुन्हा गाजवणार बॉलीवूड! ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका, जाणून घ्या…

अखेर ‘बिग बॉस’ने ऐनवेळी बाजी पालटली आणि अंकित लोखंडेसह तिची संपूर्ण टीम नॉमिनेट झाल्याचं गेल्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळालं. अंकिता, इशा, आएशा व विकी जैन एकत्र नॉमिनेट झाल्याने हे चौघंही घरातील इतर सेफ झालेल्या स्पर्धकांशी वाद घालू लागले. याशिवाय अंकिता, इशा, आएशा या तिघीजणी मिळून मनाराशी भांडण करत होत्या असं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मिळालं. परंतु, या सगळ्या गोष्टी मनाराने अत्यंत सकारात्मकतेने हाताळल्या असा दावा एका मराठी अभिनेत्रीने केला आहे. अंकिता लोखंडे व मनारा चोप्राच्या भांडणावर खास पोस्ट शेअर करत गायत्री दातारने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गायत्री यात लिहिते, “अंकित खूप जास्त ओव्हर अ‍ॅक्टिंग करते असं माझं ठाम मत आहे. प्रत्येक भागात आपल्याला तिची ओव्हर अ‍ॅक्टिंग पाहायला मिळतेय. गेल्या काही भागांपासून घरात तिचा वावर दिसला तरीही त्रासदायक वाटतं. तिच्या मैत्रिणी इशा आणि आएशा या दोघींबद्दल तर मला काहीच बोलायचं नाही. या सगळ्यांनी मिळून मनाराच्या चारित्र्यावर बोट ठेवलं. तिच्यावर वाईट कमेंट्स केल्या…पण, त्या घरात मनारा एकटी सगळ्या गोष्टींना समोरी जात आहे.”

हेही वाचा : “सासू, नणंद वगैरे…”, ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर चाहतीची कमेंट; अभिनेत्री म्हणाल्या, “माझ्या सासरचे…”

“‘बिग बॉस मराठी’मध्ये मी स्वत: १२ आठवडे राहिली आहे. पण, कधीच एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर कमेंट केली नाही. हे करणं अजिबात योग्य नाही. अंकिता आणि तिच्या दोन सेवक इशा-आएशाने या गोष्टी करणं ताबडतोब थांबवलं पाहिजे. आज नॅशनल टेलिव्हिजनवर या गोष्टी सुरू आहेत. एखाद्या महिलेला अशाप्रकारे अपमानित करणं अजिबातच योग्य नाही.” अशी संतप्त पोस्ट गायत्रीने शेअर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
gayatri datar
गायत्री दातारची पोस्ट

दरम्यान, अभिनेत्री गायत्री दातार ‘तुला पाहरे रे’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. पुढे, तिने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभाग घेतला. त्यामुळे ‘बिग बॉस’चं घर आणि खेळाबद्दल तिला अनेक गोष्टी माहिती आहेत.