शिल्पा शिरोडकर नुकतीच ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वात झळकली होती. शिल्पा अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. त्यादरम्यान शिल्पा अनेकदा चर्चेत होती. अशातच आता शिल्पा पुन्हा चर्चेत आली आहे. शिल्पाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने तिला कोविड झाल्याचा खुलासा केला आहे.

शिल्पाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत याबद्दलची माहिती दिली आहे. शिल्पाने या पोस्टमधून “मला करोनाची बाधा झाली आहे”, असे म्हटले आहे. तर त्यासह तिने तिच्या चाहत्यांना सुरक्षित राहण्यासह मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. तिच्या या पोस्टखाली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने, “काळजी घे आणि लवकर बरी हो”, असे म्हटले आहे. तसेच, शिल्पाची बहीण व अभिनेत्री नम्रता शिरोडकरनेही कमेंटमधून “तिला लवकर बरी हो”, असे म्हटलं आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये असताना शिल्पा प्रेक्षकांच्या आवडत्या सदस्यांपैकी एक होती. तर तिला बिग बॉसची आई, असे म्हणूनही संबोधले जायचे. तर यादरम्यान ती, विवियन डिसेना व करणवीर मेहरा यांच्या मैत्रीनेही अनेकांची मने जिंकली. या त्रिकुटाला प्रेक्षक पाठिंबा देताना दिसले.

शिल्पा सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी सोशल मीडियामार्फत तिच्या चाहत्यांसह शेअर करीत असते. काही दिवसांपूर्वी तिने वूमन्स डेनिमित्त नम्रता शिरोडकर व त्यांच्या आईबरोबरचे काही जुने फोटो पोस्ट केले होते. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील या दोन महत्त्वाच्या स्त्रियांचे आभार मानले होते. शिल्पा शिरोडकर व नम्रता शिरोडकर या दोघी बहिणींनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. लग्नानंतर या दोघी अभिनय क्षेत्रात फार सक्रिय राहिल्या नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिल्पाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘भ्रष्टाचार,’ ‘किशन कन्हैया,’ ‘बेनाम बादशाह,’ ‘बेवफा सनम,’ ‘हम है बेमिसाल,’ ‘गोपी किशन,’ ‘गाजा गामिनी,’ ‘गन्स ऑफ बनारस’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अशातच आता ती ‘जटाधारा’ या तेलुगू चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.