Bigg Boss 19 Awez Darbar Gets Emotional : ‘बिग बॉस १९’ नुकतंच सुरू झालं आहे, नवीन पर्व सुरू होऊन काहीच दिवस झालेले असताना आता यातील स्पर्धकांमध्ये वाद सुरू झाला आह. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक अवजे दरबाजला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतं. स्पर्धकांमध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…
‘बिग बॉस १९’व्या पर्वातील पहिलं नॉमिनेशन या आठवड्याच्या शेवटी पार पडणार आहे, जिथे सर्व सदस्य समोरासमोर येऊन असेंब्ली रूममध्ये एकमेकांना नॉमिनेट करणार आहेत. या टास्कदरम्यान अवेज दरबाज गौरव खन्नाला नॉमिनेट करताना दिसतो, ज्यामुळे त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
गौरव खन्ना व अवेज दरबाजमध्ये नेमकं काय घडलं?
‘कलर्स’ वाहिनीने नुकताच ‘बिग बॉस’चा नवीन प्रोमो शेअर केला होता. यामध्ये स्पर्धक एकमेकांना नॉमिनेट करताना दिसत आहेत. यावेळी अवेज गौरवला नॉमिनेट करतो. गौरवला नॉमिनेट करण्यामागचं कारण सांगत तो म्हणतो, “मला वाटतं त्यांच्याकडे कोणतीही ड्युटी नाहीये, त्यामुळे मी गौरव दादाला नॉमिनेट करतो.” त्यावेळी गौरव त्याला, “तुला नतालिया जानोस्झेकचा सहभाग माझ्यापेक्षा वाटतो?” पुढे फक्त एवढंच सांग असं म्हणतो. अवेज त्याला यावर “मला फसणूक करत खेळ खेळणारे आवडत नाही” असं सांगतो. त्यावेळी यावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो.
अवेज पुढे नगमा शेजारी बसून रडताना दिसतो. त्यावेळी अमाल मलिक त्याला काय झालं असं विचारतो, तर नगमा म्हणते, “त्याला वाईट वाटलं आहे.” यावेळी घरातील इतर स्पर्धक त्याची समजूत काढताना दिसतात.
दरम्यान, फरहाना भट्ट मिड-वीक एविक्शनमुळे ती घरातून बाहेर पडली आहे. ‘बिग बॉस १९’ सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मिड-विक एविक्शन पार पडलं असून फरहाना भट्ट घरातून बाहेर पडणारी पहिली सदस्य आहे. परंतु, यामध्ये एक ट्विस्ट आहे. फरहाना भट्ट घरातून बाहेर पडली असली तरी ती शोमधून बाहेर झालेली नाही.
फरहानाला सिक्रेट रूममध्ये पाठवण्यात आलं आहे, जिथून तिला घरातील स्पर्धक काय करत आहेत, त्यांच्या सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवता येईल; त्यामुळे ती सिक्रेट रूममधून बाहेर आल्यानंतर पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल.