Bigg Boss 19 Contestant Ashnoor Kaur Reveals She Took Tips From Hina Khan : ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ फेम अशनूर कौर ‘बिग बॉस’ सीझन १९ मध्ये सहभागी झाली आहे. अशनूर खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आलेली ते ‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेमुळेच. यामध्ये तिने हिना खानच्या ऑनस्क्रीन लेकीची भूमिका साकारलेली. अशातच आता ‘बिग बॉस’मध्ये जाण्यापूर्वी तिने हिनाकडून टिप्स घेतल्याचं म्हटलं आहे.

‘बिग बॉस’च्या घरामध्ये जाण्यापूर्वी तिने ‘द फ्री प्रेस जरनल’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. काल २४ ऑगस्टला ‘बिग बॉस १९’चा प्रीमियर प्रदर्शित झाला. यंदाच्या सर्व सदस्यांची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री झाली. २१ वर्षीय अशनूरनेदेखील ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतला असून या घरात जाणारी ती पहिली सदस्य होती. अशनूरने मालिकांपासून सुरू केलेला तिचा प्रवास आता रिअॅलिटी शोपर्यंत येऊन पोहोचला आहे. लहान वयातच तिने खूप यश मिळवलं आहे. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधी तिने तिची ऑनस्क्रीन आई हिना खानसह संवाद साधलेला.

‘बिग बॉस’साठी अशनूर कौरने हिना खानकडून घेतलेल्या टिप्स

अशनूरला मुलाखतीत “तू तुझ्या ऑनस्क्रीन आईकडून काही सल्ला किंवा टिप्स घेतले होते का?” असं विचारण्यात आलेलं. हिना खाननेही ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतला होता. ११व्या सीझनमध्ये अभिनेत्री झळकलेली आणि ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेली. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, “हो मी तिच्याकडून टिप्स घेतल्या होत्या. आम्ही पूर्ण ३ तास याबद्दल बोलत होतो. तिने मला काय करायचं आणि काय नाही याबद्दल सांगितलं. मी रोहन मेहरा (‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम रोहन मेहरा १०व्या सीझनचा सदस्य होता) बरोबरही संवाद साधला. त्यांच्याशी बोलनू छान वाटलं, मला यामुळे ‘बिग बॉस’बद्दल माहिती मिळाली.”

मुलाखतीत पुढे तिला जेव्हा ‘बिग बॉस’ मधील तिचा आतापर्यंतचा आवडता स्पर्धक कोण आहे असं विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, “मला हिना ताई ज्या पद्धतीने खंबीरपणे खेळली ते खूप आवडलं. तिने प्रत्येक टास्कमध्ये चांगली कामगिरी केली. या दोन गोष्टी मी ‘बिग बॉस’च्या घरात करणार आहे. यासह प्रियांका (चहर चौधरी) तिच्या सीझनमध्ये नेहमी तिची मतं ठामपणे मांडायची, ती खूप निडर होती.”

दरम्यान, ‘बिग बॉस’ १९च्या घरात १६ स्पर्धकांची एन्ट्री झाली असून यामध्ये अशनूर कौर, जीशान कादरी, तानिया मित्तल, अवेज दरबाज, नगमा मिराजकर,नेहल चुडासमा, बसीर अली, अभिषेक बजाज, गौरव खन्ना, नतालिया जानोस्झेक, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, नीलम गिरी, कुनिका सदानंद, मृदूल तिवारी, अमाल मलिक हे सहभागी झाले आहेत.