Gaurav Khanna Wife Entry : टीव्हीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस १९’चा फिनाले आता फक्त तीन आठवड्यांवर आला आहे. शोचे आणि शोमधील स्पर्धकांचे अनेक चाहत्यांना यंदाच्या ‘बिग बॉस १९’चा विजेता कोण होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच सोमवारपासून ‘फॅमिली वीक’ला सुरुवात झाली आहे. एकेक करत स्पर्धकांचे कुटुंबीय ‘बिग बॉस’च्या घरात येत आहेत. अशातच आता गौरव खन्नाची पत्नीही येणार आहे.

सोमवारच्या भागात कुनिका सदानंद यांच्या मुलाने शोमध्ये एंट्री घेतली आहे. त्यानंतर अशनूर कौरचे वडील घरात आले. आता अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलाही शोमध्ये येणार आहे. याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. पत्नीला पाहून गौरव खूप भावूक झाल्याचं दिसत आहे.

पत्नीला पाहून गौरव खन्ना भावूक

BB Tak ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस’ जाहीर करतात की गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा घरात येणार आहेत. त्यानंतर गौरव आकांक्षाला पाहून थोडे भावूक होतात. मग ‘बिग बॉस’ गौरवला फ्रीज करतात आणि दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. दरम्यान, काही रिपोर्ट्सनुसार, आकांक्षा आपल्या पतीला प्रणित मोरेपासून लांब राहण्याचा सल्लाही देईल, असं सांगण्यात येतंय.

टास्कमध्ये भाग घेणार आहे आकांक्षा

‘बिग बॉस १९’मध्ये एक राशन टास्क होणार आहे, ज्यामध्ये गौरव खन्ना आणि आकांक्षा यांना दोन बॅट्सच्या मदतीने बॉल बॅलेन्स करत चालावं लागणार आहे. त्यांना बॉल पडू न देता, लाकडी रॅम्पवर चालत बॉल डिपॉझिट बॉक्समध्ये ठेवायचा आहे. १० मिनिटांमध्ये जितके बॉल डिपॉझिट बॉक्समध्ये जमा होतील, तितकं घरासाठी जास्त राशन मिळणार आहे.

फरहानाच्या आईने गौरवचे मानले आभार

यानंतर, फरहाना भट्टची आई शोमध्ये येईल आणि गौरवला ‘बेटा’ म्हणत त्याचे आभार मानणार आहे. BB Tak च्या रिपोर्टनुसार, फरहानाच्या आईने गौरवला धन्यवाद म्हटलं, कारण फरहाना घरातून बाहेर गेल्यानंतर त्यानेच तिला परत आणलं. फरहानाच्या आईने तिची समजूत काढत सांगितलं की, गौरवच्या कामाबद्दल बोलणं ही मोठी चूक होती आणि ती फक्त गौरवमुळेच शोमध्ये आहे.