बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. लवकरच सईच्या घरी पाहूणा येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट करत सईने गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली होती. नुकतचं सईच डोहाळे जेवणही पार पडलं. या डोहाळे जेवणाचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
हेही वाचा- अमृता देशमुख होणारा नवरा प्रसादला लाडाने ‘या’ नावाने मारते हाक; अभिनेत्रीने केला खुलासा म्हणाली..
दरम्यान सईच्या डोहाळे जेवणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये सई एक खेळ खेळताना दिसत आहे. सईसमोर दोन वाट्या झाकून ठेवल्या आहेत. त्यातील एक वाटी सईला निवडायची होती. एका वाटीत खीर आणि दुसऱ्या वाटीत गुलाबजामून लपवून ठेवला आहे. असं म्हणतात खीरीची वाटी उचलली तर मुलगी होणार आणि गुलाबजामूनची वाटी उचलली तर मुलगा होणार. सईने उचललेल्या वाटीत खीर होती. त्यामुळे मला मुलगी होणार असं म्हणतं सई आनंदाने हसताना दिसत आहे. सईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने मराठीबरोबर अनेक हिंदी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘किस किसको प्यार करू’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ मधील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातही ती सहभागी झाली होती.