मराठमोळा शिव ठाकरे सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘बिग बॉस’मुळे शिवच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. शिव ठाकरे ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वाधिक चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता. शिवने उत्तम खेळी व त्याच्या स्वभावाने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांची मनंही जिंकून घेतली होती.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर शिवने नवी कोरी कार खरेदी केली होती. शिवने जवळपास ३० लाख किंमतीची ‘टाटा हॅरिअर’ ही गाडी खरेदी केली होती. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. आपली नवी गाडी घेऊन शिव नुकताच अमरावतीतील त्याच्या घरी गेला होता. याचा व्हिडीओ शिवच्या फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> “क्रिकेटर्स माझ्याकडे वाईट नजरेने…”, मंदिरा बेदीने क्रिकेट विश्वाबद्दल केलेला खुलासा, म्हणालेली, “त्यांना वाटायचं मी…”

शिवची गाडी पाहिल्यानंतर त्याच्या आईचा आनंद गगनाच मावेनासा झाला होता. व्हिडीओमध्ये शिवची आई त्याच्या गाडीची पूजा करताना दिसत आहेत. त्यानंतर शिवने त्याच्या नव्या कोऱ्या कारमधून कुटुंबियांना सफरही घडवल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

हेही वाचा>> ‘कबीर सिंग’मध्ये वनिता खरातबरोबर काम केल्यानंतर ‘अशी’ होती शाहीद कपूरची प्रतिक्रिया, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली “सीन शूट झाल्यानंतर…”

शिव अनेक रिएलिटी शोमध्ये झळकला आहे. ‘रोडीज’मध्ये शिव सहभागी झाला होता. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही त्याने सहभाग घेतला होता. या पर्वाचा तो विजेता ठरला होता. बिग बॉसनंतर शिवला चित्रपटाच्या ऑफरही मिळाल्या आहेत. शिवने ‘ठाकरे : चाय अँड सॅन्क्स’ नावाचा ब्रँडही सुरू केला आहे.