‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला २ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. इतर पर्वांप्रमाणे हे पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदाच्या पर्वात रात्रीस खेळ चाले मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरही सहभागी झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच अपूर्वा बिग बॉसच्या घरात चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अपूर्वाला रात्रीस खेळ चाले मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने साकारलेल्या शेवंता पात्रावरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. ‘बिग बॉस’च्या घरात याबद्दल चर्चा करताना अपूर्वाने तिच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी सांगितल्या. लिव्हिंग एरियामध्ये अपूर्वा, अमृता आणि अक्षय गप्पा मारत बसले होते. यावेळी अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शूटिंगचे किस्से सांगितले. ती म्हणाली, “त्यावेळी मी तीन प्रोजेक्ट्स करत होते. दादर ते मालाड मग मालाड ते मड असा प्रवास मला करायला लागत होता. ते प्रोजेक्ट संपल्यानंतर मालिकेचं शूटिंग लोकेशन सावंतवाडीत असल्यामुळे मला तिथे जावं लागायचं”.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
Surya's revelations about Bumrah
MI vs RCB : जसप्रीत बुमराहला नेट्समध्ये खेळायला घाबरतो सूर्यकुमार यादव, स्वत:च केला खुलासा; म्हणाला तो…

हेही वाचा >> डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानंतर आलिया-रणबीरला माधुरी दीक्षितने दिलं खास गिफ्ट, नीतू कपूर म्हणाल्या…

हेही पाहा >> Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?

पुढे अपूर्वा म्हणाली, “दादर ते सावंतवाडी असा १२ तास प्रवास करून मी कधीकधी फक्त एक सीन शूट करण्यासाठीसुद्धा गेलेले आहे. त्यावेळी मी आठवड्यातील पाच दिवस मालिकेचं शूटिंग करायचे. शुक्रवारी शूटिंग संपल्यावर मी सावंतवाडीवरून ट्रेन किंवा विमानाने दादरला यायचे. शनिवार-रविवार माझे नाटकाचे प्रयोग असायचे. ते झाल्यानंतर मी पुन्हा विमानाने गोव्याला जावून अडीच तास प्रवास करून सावंतवाडी गाठायचे. माझं गावसुद्धा सावंतवाडीत असल्यामुळे मला तिथली ओढ लागायची”. यावर अक्षय “कोकणाची ओढ सगळ्यांनाच लागते”, असं म्हणाला.

हेही वाचा >> ‘आदिपुरुष’मधील रावण पात्राबद्दल दिग्दर्शक ओम राऊतची स्पष्ट भूमिका, म्हणाला “माझ्यासाठी रावण आजही…”

“माझे बाबा पहिला सीझन बघायचे. त्यामुळे ते मला म्हणाले होते कोकणातील एखादी मालिका करता आली तर नक्की कर. माझ्या घरातील सगळ्यांना मालवणी फार उत्तम बोलता येतं. पण मला तितकंस जमत नाही. पण या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे”, असंही अपूर्वा म्हणाली.